<div class="paragraphs"><p>ST workers strike</p></div>

ST workers strike

 

sarkarnama

मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून उठविण्याचा प्लॅन ठरला...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कोरोनाची (corona) वाढती रुग्णसंख्या पाहून मुंबई शहरात जमाव बंदीचा (कलम १४४) आदेश लागू करण्यात आला आहे, त्यामुळे आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सांयकाळ पाचनंतर मैदान सोडा, अशी सूचना मुंबई पोलिस (mumbai police) प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाचे कारण देऊन सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारचा प्लॅन आहे की काय? असा सवाल आंदोलक संघटनांकडून विचारण्यात येत आहे. (Leave Azad Maidan after 5 pm : Mumbai Police instructs ST workers)

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. दरम्यान, राज्य सरकारने भरघोस पगारवाढ करूनही काही संघटना विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून त्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत, त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना वरील सूचना केली आहे.

ओमिक्रॉनची संख्या राज्यात वेगाने वाढत आहे. त्यावरील उपाय योजना म्हणून मुंबईत 144 कलम लागू आहे. संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत लोकांना एकत्र येता येणार नाही, त्यामुळे आंदोलकाना पहाटे ५ ते सायंकाळी ५ पर्यंतच आझाद मैदानावर आंदोलनासाठी थांबता येणार आहे. सायंकाळी ५ ते पहाटे ५ आझाद मैदानात कोणालाही थांबू दिलं जाणार नाही, अशी सूचना मुंबई पोलिसांनी एसटी आंदोलकांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दिवसभर मोजक्याच कामगारांना आंदोलन करता येईल, असेही सांगण्यात आले आहे. एसटी आंदोलकांनीही पोलिसांचे निर्देश मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाचा आज ५३ वा दिवस आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT