jasmine wankhede, nawab malik sarkarnama
मुंबई

नवाब मलिक अडचणीत ; 'लेडी डॅान'चा पलटवार

यास्मिन वानखेडे (jasmine wankhede)म्हणाल्या, ''माझ्यावर आरोप केले आहेत, त्याबाबत पुरावे द्या आणि मग बोला. या प्रकरणी नवाब मलिक (nawab malik) यांच्यावर कारवाई करणार आहे. ''

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik)यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि एनसीबीवर आजच्या पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला. मलिक यांनी आपल्या टि्वट हॅडलवरुन काही फोटो शेअर करुन वानखेडे व फ्लेचर पटेल, 'लेडी डॅान' यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर फ्लेचर पटेल, लेडी डॅान आणि समीर वानखेडे यांचा काय संबध असा सवाल मलिक यांनी केला. याबाबत एनसीबीनं खुलासा करावा, अशी मागणी मलिक यांनी केली.

नवाब मलिक (nawab malik) याच्या या आरोपाला फ्लेचर पटेल यांनी उत्तर दिलं आहे. लेडी डॅान कोण, याबाबत फ्लेचर पटेलांना सांगितले, पटेल यांनी सांगितले की, त्या फोटोमध्ये ज्या लेडी डॅान आहेत. त्या मोठ्या सामाजिक कार्यकर्ता आहेत. म्हणून त्यांना आदराने 'लेडी डॅान' म्हणतो. त्यांनी कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावली होती. त्या समीर वानखेडेंच्या थोरल्या भगिनी अँड. जास्मिन वानखेडे (jasmine wankhede) आहेत.

'लेडी डॅान' अॅड. यास्मिन वानखेडे या एका चित्रपट सेनेच्या कार्यक्रर्त्या असून त्या वसुली करीत असतात,''असा गंभीर आरोप मलिक यांन पत्रकार परिषदेत केला. याला यास्मिन वानखेडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, ''माझ्यावर आरोप केले आहेत, त्याबाबत पुरावे द्या आणि मग बोला. या प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करणार आहे. ''

''कॅबिनेट मंत्री असं अनव्हेरिफाईट स्टेटमेंट देत आहेत. काही स्टेटमेंट देण्यापूर्वी त्यांनी विचार करावा. माझा भाऊ योग्य कारवाई करत आहे. मी मनसे चित्रपटच सेनेत उपाध्यक्ष आहे आणि कायदेशीर काम पाहते. माझ्या राजकीय स्टेटसचा आणि माझ्या कामाचा त्यांनी आदर करायला हवा. समाजाला ते चुकीची प्रेरणा देत आहेत, त्यांना हे समजायला हवं. पुरावे द्या आणि मग बोला, असं आव्हान यास्मिन वानखेडे यांनी मलिकांना दिल.

फ्लेचर पटेल (Fletcher Patel) म्हणाले, ''मी एक माजी सैनिक असून समीर वानखेडे हे (Sameer Wankhede) मोठे व्यक्ती असून त्यांचे चांगले काम आहे. सैनिक फेडरेशन मुंबईचा अध्यक्ष म्हणून मी वानखेडे आणि एनसीबीला मदत करीत असतो. काही जण देशात ड्रग्ज विक्री करीत आहेत. त्यामुळे तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यांना रोखण्यासाठी मी एनसीबीला मदत करत असतो. समीर वानखेडे यांना मीच नाही तर संपूर्ण देश ओळखतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT