Eknath Shinde News : विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देत मोठा डाव खेळला. त्यामुळे शिंदे गट देखील 'अॅक्टिव्ह मोड'वर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता.2) रात्री सह्याद्री अतिथी गृहावर आपल्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत महायुतीचे सर्व 9 जागा निवडून आणायच्या आहेत, असे सांगत आगामी विधानसभेच्या तयारीलाही लागण्याच्या सूचना केल्या आहेत.
आत्तापासूनच विधानसभेच्या तयारीला लागा. आपआपल्या मतदारसंघाती लोकांच्या संपर्कात राहा, 'लाडकी बहिण' सारख्या शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या आमदारांना केल्या आहेत.
महाविकास आघाडीला MVA लोकसभेत मिळालेल्या यशामुळे महायुतीमध्ये चिंता आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणाचे आमदार फुटणार याची चिंता देखील महायुतीमधील पक्षांना आहे. नार्वेकर यांचे सर्वपक्षीयांचे असलेले संबंध पाहता त्यांना भाजप, शिंदे गटातून मदत होण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदें यांनी बैठक घेत महायुतीच्या सर्व जागा निवडून आणायच्या आहेत, असे सांगत आपल्या आमदारांना इशाराच दिला आहे.
ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी देत निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. महाविकास आघाडीकडे दोनच उमेदवार विजयी होतील येवढेच संख्याबळ आहे. तिसरा उमेदवार विजयी होण्यासाठी महाविकास आघाडीला पाच ते सहा आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे महायुतीचे पाच ते सहा आमदार फुटणार का?
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.