Maharashtra MLC Election
Maharashtra MLC Election sarkarnama
मुंबई

Maharashtra MLC Election : तीन विद्यमान आमदारांना नाकारले ; आघाडीला ३ तर, भाजप, अपक्ष प्रत्येकी एका जागेवर विजय

सरकारनामा ब्युरो

Maharashtra MLC Election : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणार्‍या जाणाऱ्या पाच विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाला जाहीर झाला आहे. यात भाजप व अपक्ष उमेदवारास प्रत्येकी एका जागी विजय मिळाला. महाराष्ट्र विकास आघाडीला तीन जागेवर विजय मिळवला आहे. अमरावतीमध्ये फेरमतमोजणी सुरु असून येथे आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत.

नाशिक पदवीधरमध्ये मविआच्या शुभांगी पाटलांपेक्षा २९ हजारांचे मोठे मताधिक्य घेऊन अपक्ष सत्यजित तांबे विजयी झाले.सत्यजित तांबेंना ६८,९९९ मते मिळाली आहे. तर मराठवाडा शिक्षकमध्ये मविआच्या विक्रम काळेंनी सलग चौथ्या विजयाचा विक्रम केला. त्यांना २३,५७७ मते मिळाली आहेत.

नागपुरात मविआचे सुधाकर अडबाले तर अमरावतीत धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. अमरावती पदवीधरमध्ये त्यांचे विद्यमान आमदार ना. गो. गाणार व डॉ. रणजित पाटलांचा मविआने धक्कादायक पराभव केला.

सविस्तर निकाल

नाशिक :पदवीधर

सत्यजित तांबे विजयी (अपक्ष) एकूणमते ६८,९९९

शुभांगी पाटील (मविआ) २९,४६५ मतांनी पराभूत

नागपूर : शिक्षक

सुधाकर अडबाले विजयी (मविआ) एकूण मते १६,७००

ना.गो. गाणार (भाजप) ८,४८९ मतांनी पराभूत

मराठवाडा :शिक्षक

विक्रम काळे, मविआ दुसऱ्या पसंतीत विजयी, एकूण मते २३,५७७

किरण पाटील (भाजप) ६,९३४ मतांनी पराभूत

कोकण :शिक्षक

ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी (भाजप),एकूण मते २०,६८३ मते

बाळाराम पाटील (मविआ) ९,६८६ मतांनी पराभूत

अमरावती : पदवीधर

धीरज लिंगाडे आघाडीवर (मविआ), दोन हजारांचे मताधिक्य

पिछाडीवर (भाजप) डॉ. रणजित पाटील

(फेरमतमोजणी सुरु)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT