Bhagatsingh Koshyari On Uddhav Thackeray
Bhagatsingh Koshyari On Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Bhagatsingh Koshyari News : जे झालं ते विसरून पुढे जाऊया; राज्यातल्या सत्तांतरावर कोश्यारींची भूमिका..

महेश जगताप

Bhagatsingh Koshyari On Uddhav Thackeray : महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर म्हणाले, "आता जे झाले आहे ते झाले आहे , मागील झालेल्या सत्तांतराच्या काही गोष्टी काढून उपयोग नाही, आत्ता ते विसरून पुढे गेले पाहिजे, अशी भगितसिंग कोश्यारींनी मांडली.

माजी राज्यपाल कोश्यारी हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षावरील निर्णयानंतर पहिल्यांदाच राजभवनात काल आपल्या काही नियोजित कामसंबंधी आलेले आहेत. यावेळी कोर्टाने सत्तांतरांचा निर्णय देताना आपल्यावर गंभीर ताशोरे ओढलेले आहेत, याकडे आपण कसे पाहता असे विचारले असता, "जे झाले आहे ते झाले आहे, ते विसरून आपण पुढे गेले पाहिजे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर याविषयी बोलण्यास ते निरउत्साही दिसून आले .

भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदाची शपथ घेतल्यापासूनच महाराष्ट्रात वादग्रस्त निर्णयांची मालिका ठरली होती. यातील परमोच्च बिंदू म्हणजे महविकास आघाडी सरकार पडून महायुतीचे म्हणजेच आत्ताची शिवसेना व भाजप यांचे सरकार सत्तेत येताना राज्यपाल यांनी संविधानिक वैधानिकता पाळली नाही, असा मुख्य आरोप विरोधी पक्षांचा होता.

त्यामुळे ते राज्यभर टीकेचे धनी झाले होते .याच पार्श्वभूमीवर सत्तांतराच्या निकालावर सुप्रीम कोर्टाने राज्यपाल यांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केल्याने, आणखीन विरोधकांच्या टीकेला दुजोरा मिळाला .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT