Linhayat Community march in Mumbai
Linhayat Community march in Mumbai Sarkarnama
मुंबई

Lingayat community : लिंगायत समाजाच्या मोर्चाला मोठे यश; या महत्त्वाच्या मागण्या मान्य

सरकारनामा ब्युरोे

Lingayat Samaj March : मुंबईतील आझाद मैदानात लिंगायत समाजाच्या वतीने विविध मागण्यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य सरकारकडून त्यांच्या सुमारे ७०-८० टक्के मागण्या मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे मार्चा माघार घेत असल्याची घोषणा अविनाश भोसीकर आणि विनय कोरे यांनी केली.

लिंगायत समाजाला (Lingayat Community) धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा मिळावा यासह समाजाच्या विविध मागण्यासाठी काढलेल्या मार्चात समाजाचे मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराच यावेळी आंदोलकांनी दिला होता. दरम्यान सरकारकडून महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.

याबाबत अविनाश भोसीकर (Avinash Bhosikar) म्हणाले, २२ जानेवारी रोजी समाजाच्या मागण्यांवर चर्चा झाली होती. राज्य सरकारने आपल्या अधीनस्थ मागण्या मान्य केल्या आहेत. तरकाही केंद्र पातळीवरील विषय आहेत, त्यासाठी यापुढेही लढा सुरूच राहील.

विनय कोरे (Vinay Kore) म्हणाले, राज्यसरकारडून सुमारे ८० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यात बसवेश्वर यांच्या नावाचं विद्यापीठ तयार करणे, बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, आदी मागण्यांचा समावेश आहे. याबाबत येणाऱ्या अधिवेशनापूर्वी घोषणा करण्याची आग्रही मागणी केली ती मान्य होईल.

महाराष्ट्र विधिमंडळात बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती, ती राज्यसरकारने मान्य केली. त्यासाठी जागा शोधणं सुरू आहे. उपलब्ध झाली नाही तर तिथे तैलचित्र लावण्याचं मान्य करण्यात आल्याची माहितीही कोरे यांनी दिली आहे. भारतीय लिंगायत समन्वय समितीचे विजय हतुरे (Vijay Hature) यांनी जवळपास ८० टक्के मागण्या मान्य केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले.

लिंगायत समाज्याच्या या आहेत मागण्या

लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी

राज्यातील लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा जाहिर करणे

सोलापूरमधील मंगळवेढा येथे मंजूर महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरीत सुरु करणे

मुंबई येथील विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारावा

महात्मा बसवेश्वर (Basaveshwar) आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे

गाव तेथे रुद्रभुमी (स्मशानभुमी) आणि गाव तेथे अनुभव मंडप (सभामंडप) करणे

समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह निर्माण करणे

राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत समाजासाठी स्वतंत्र कॉलम द्यावा

सरकारने शुध्दीपत्रक काढून वीरशैव लिंगायत व हिंदू लिंगायत अशी नोंद असलेल्यांचा ओबीसी घटकामध्ये समावेश करावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT