Sharad Pawar News Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : शरद पवारांच्या बैठकीला कोणते आमदार अन् खासदार उपस्थित? पाहा संपूर्ण यादी

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Political Crisis Live : अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. दोन्ही गटाकडून आज बुधवारी मुंबईत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन केले. अजित पवार (Ajit Pawar) गटाला जवळपास ३५ आमदारांचा पाठिंबा आहे. तर शरद पवार गटाला १७ आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर सभागृहात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. यामध्ये १३ विधानसभा आमदार, ३ विधानपरिषदेचे आमदार आणि ५ खासदार उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे विधानसभेच्या आमदारांचे संख्याबळ जास्त असले तरीही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये शरद पवार यांच्याकडे बहुमत आहे.

शरद पवार यांच्या बैठकीला आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh), रोहित पवार (Rohit Pawar), राजेंद्र शिंगणे, अशोक पवार, किरण लहमटे, प्राजक्ता तनपुरे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, चेतन तुपे, जयंत पाटील, राजेश टोपे, संदीप क्षीरसागर आणि अपक्ष आमदार देवेंद्र भुयार उपस्थित होते.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे हे लोकसभेतील खासदार होते. तर फौजिया खान, वंदना चव्हाण आणि स्वत:हा शरद पवार हे राज्यसभेचे खासदार उपस्थित होते.

शरद पवारांना विधान परिषदेच्या आमदारांचाही पाठिंबा आहे. त्यामध्ये शशिकांत शिंदे, बाबाजानी दुराणी आणि एकनाथ खडसे हे उपस्थित होते. दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे. अजित पवार यांनी शपथविधीआधी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली.

या याचिकेवर राष्ट्रवादीचे खासदार आणि आमदार मिळून अशा एकूण 40 जणांच्या सह्या आहेत. अजित पवार यांनी शपथविधीच्या आधी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता अजित पवार यांनी पूर्ण पक्षावर दावा केल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT