Raj Thackeray, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

BJP-MNS Alliance: गुढीपाडवा मेळाव्याआधीच फडणवीसांनी मनसेबाबत टाकला मोठा बॉम्ब; म्हणाले, 'महायुतीत मनसे...'

Lok Sabha Election 2024: राज ठाकरे आपली भूमिका उद्याच्या गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर करणार आहेत. याबाबतचे संकेत त्यांनी टीझरद्वारे दिले आहेत, तर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे हे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी 2014 मध्ये नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान करण्यासाठी जाहीर भूमिका घेतली होती. त्यामुळे आताही राज ठाकरे हे मोदींना पाठिंबा देतील, अशी अपेक्षा असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

राज्यात लोकसभेसाठी (Lok Sabha) महायुतीने जोरदार फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट सामील आहेत. तरीही युतीत मनसेला (MNS) सहभागी करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेटदेखील घेतली आहे.

त्यामुळे मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मनसे युतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी याबाबत मनसेकडून काही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही, तर राज ठाकरे (Raj Thackeray) आपली भूमिका उद्याच्या गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर करणार आहेत. याबाबतचे संकेत त्यांनी टीझरद्वारे दिले आहेत, तर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "मनसेने (MNS) हिंदुत्वाची भूमिका घेतली तेव्हापासून आमची जवळीक वाढली आहे. राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे. शिवाय राज ठाकरे हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी 2014 मध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी जाहीर भूमिका घेतली होती. मधल्या काही काळात त्यांनी वेगळी भूमिका घेतली.

मात्र, मागील 10 वर्षांत मोदींनी ज्या प्रकारे विकास केला आहे ते पाहून आणि ज्यांच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे, अशा सर्वांनी पंतप्रधान मोदींच्या पाठीशी राहिलं पाहिजे. त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीबरोबर येईल असा मला विश्वास आहे. परंतु, याबाबतचा निर्णय राज ठाकरेंना घ्यायचा आहे." त्यामुळे आता उद्या राज ठाकरे महायुतीबाबत काय भूमिका घेणार? याबाबतची उत्सुकता मनसे कार्यकर्त्यांसह महायुती समर्थकांना लागली आहे.

(Edited By Jagdish Patil)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT