Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Kalyan Dombivli News : मुख्यमंत्री शिंदेंनी केलं लेकाचं कौतुक; कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत सूचक विधान

CM Eknath Shinde On Kalyan Lok Sabha Constituency : डोंबिवलीतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले मोठे विधान...

सरकारनामा ब्यूरो

Kalyan Lok Sabha Constituency : कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक कोण लढणार, यावरून अनेक दिवसांपासून राजकारण रंगले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे चिरंजिव डॉ. श्रीकांत शिंदे हे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. यावरून महायुतीमधील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात मोठे विधान केले आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपकडून होणारा दावा एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे फेटाळून लावला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाची चिंता मला नाही. कारण इथे खासदार श्रीकांत शिंदे आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी दिलेला निधीचा आकडा हा भरपूर मोठा आहे. सांगत नाही. नाहीतर तो कमी करावा लागेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नागरिकांना चांगले रस्ते, विरंगुळ्याची साधने इतर सोयी सुविधा मिळाली पाहिजे. हा निधी देण्यामागचा उद्देश एकच आहे. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक प्रकल्प सुरू आहेत आणि भविष्यातही होतील, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा मतदारसंघावरील पक्षाचा खुंटा बळकट केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्रीकांत शिंदे यांचे मी अभिनंदन करतो. कारण चांगला खासदार तुम्हाला लाभलेला आहे. मला महाराष्ट्रात सगळीकडे फिरायचे आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी आता ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री बनून काम करा. कारण मी जमिनीवरचा माणूस आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना आवाहन केले. तसेच पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे कौतुकही केले.

Edited by Sachin Fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT