nana patole uddhav thackeray sharad pawar sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : पवार अन् ठाकरेंसमोर काँग्रेस झुकली; सांगली, भिवंडीवर सोडलं पाणी

Mahavikas Aghadi Seat Sharing : सांगली आणि भिवंडीतील काँग्रेसचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Akshay Sabale

गेल्या काही दिवसांपासून सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेसमध्ये वाद सुरु होता. या जागांवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, सांगली आणि भिवंडीच्या जागेवर काँग्रेसनं पाणी सोडलं आहे. सांगलीमधून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील ( Chandrahr Patil ), तर भिवंडीतून राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे ( Suresh Mhatre ) उर्फ बाळ्यामामा लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सांगली आणि भिवंडीतील काँग्रेसचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबईतील नरीमन पॉइंट येथील 'शिवालय' येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. याला शिवसेना ( ठाकरे गट ) अध्यक्ष उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ), काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले ( Nana Patole ), काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ), खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ), राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ), शेकापचे नेते जयंत पाटील आणि महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी जागावाटप जाहीर केलं. त्यानुसार शिवसेना 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी 10 लोकसभेच्या जागा लढविणार आहे. तर, सांगलीची जागा ठाकरे गट आणि भिवंडीची जागा राष्ट्रवादी लढणार असल्याचं जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. तसेच, सांगलीतून इच्छुक उमेदवार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

नाना पटोले म्हणाले, "काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना केंद्रातील तानाशाही सरकारनं दिलेल्या वर्तवणूक देशातील सगळ्यांना माहिती आहे. सोनिया गांधींची प्रकृती ठिक नसताना तासोनतास ईडीच्या कार्यालयात बसवून ठेवलं, हे काँग्रेसचा कार्यकर्ता विसरला नाही. त्यामुळे तानाशाही प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेसनं लढाई सुरू केली आहे. जागावाटपाचा तिढा आम्ही संपुष्टात आणला आहे. देशातील भाजप सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी मोठं मन करून आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केलं आहे. आमची मते एकमेकांना पडणार आहेत."

शरद पवारांनी एकाही जागेवर मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं. "लोकसभेच्या 48 पैकी एकाही जागेवर मतभेद किंवा मतभिन्नता नाही. सांगली किंवा अन्य मतदारसंबाबत एकमतांना निर्णय घेण्यात आले आहेत," असं शरद पवारांनी म्हटलं.

शिवसेना ठाकरे गट – 21

बुलढाणा, यवतमाळ, मावळ, सांगली, हिंगोली, संभाजीनगर, धाराशिव, शिर्डी, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई - ईशान्य, मुंबई - दक्षिण, मुंबई - उत्तर पश्चिम, परभणी, मुंबई दक्षिण- मध्य, कल्याण, हातकणंगले, पालघर, जळगाव

काँग्रेस - 17

नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – 10

बारामती, शिरूर, सातारा, दिंडोरी, माढा, रावेर, अहमदनगर, बीड, वर्धा, भिवंडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT