Lok Sabha Election 2024 : Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : महायुतीचं ठरलं! अजितदादा-अमित शाहांच्या बैठकीनंतर उद्या होणार जागावाटपाची घोषणा...

Amit Shaha News : जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली.

Chetan Zadpe

Mumbai News : महायुतीच्या जागांवर उद्या शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शाहांसोबतच्या बैठकीनंतर महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे महायुतीच्या जागांबाबत 'फायनल ठरलं' असल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

आज सकाळपासूच अजित पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) सर्व जागांचा आढावा घेतला. उद्याही याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. मात्र, जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. कारण उद्याच जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज रात्री साडेआठ वाजता अमित शाह यांची भेट सह्याद्री अतिथीगृहात अजित पवार (AJit Pawar) घेणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील. याच बैठकीत जागावाटपावर अंतिम निर्णय होणार आहे. यानंतर उद्या पुन्हा एकदा अजित पवार आणि शाह यांची औपचारिक बैठक होईल. या बैठकीनंतर जागावाटपाबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT