Mumbai News, 17 May : महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. मुंबई आणि परिसरातील मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी ( mahavikas Aghadi ) आणि महायुतीनं ( Mahayuti ) कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या उपस्थितीत महायुतीची शिवाजी पार्क येथे सभा पार पडत आहे. या सभेतून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
"उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचे महाराष्ट्रात चालणार नाहीत नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे ( Raj Thackeray )," असं म्हणत आठवले Ramdas Athawale यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. तसेच, विरोधकांकडून संविधान बदलाचा मुद्दा सातत्यानं चर्चेत आणला जातो. यावरूनही आठवले यांनी विरोधकांना फटकारलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रामदास आठवले म्हणाले, "काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध करत आलेत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्याकडे का गेला तुम्ही उद्धव ठाकरे? देशात डॉ. बाबासाहेब ठाकरे यांचं संविधान मजबूत आहे. देशात पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे आणि हा पठ्ठ्या ( आठवले), आम्ही सर्वजण मजबूत आहोत."
"उद्धवजी तुम्ही वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करत असाल, तर बोला. पण, चार तारखेला आम्हीच देणार आहोत, तुम्हाला टोला... मोदींचं नेतृत्व विकासाच्या दिशेने चालेलं आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असून त्याला पंतप्रधान मोदींनी भरपूर पैसे दिले आहेत. अजूनही मुंबईच्या विकासासाठी हजारो कोटी रूपये मिळणार आहेत. मुंबईला तोडण्याचा कुणाचाही डाव नाही. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईला कोणी तोडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला झोडून टाकल्याशिवाय राहणार नाही," असा इशाराही आठवलेंनी दिला आहे.
"निवडणुका आल्यावर मुंबई तोडणार, बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलणार, असं बोललं जातं. पण, बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान धोक्यात नाही. तर महाविकास आघाडी धोक्यात आहे. कोणाच्या बापाचा बाप आला तरी बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलू शकत नाही. संविधान बदलण्याचा गैरसमज समाजात पसरवला जातोय," असा आरोप आठवलेंनी विरोधकांवर केला आहे.
"मी बाळासाहेब ठाकरे यांना भेटल्यावर शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग केला. ही शिवशक्ती-भीमशक्ती महायुतीच्या स्टेजवर आहे. नरेंद्र मोदी आहेत, देशात घोंघावणार तुफान... पण राहुल गांधी तुम्ही राजकारणात करत आहेत घाण," अशी टीका आठवलेंनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.