amol kirtikar eknath shinde sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : कीर्तिकरांविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला, ठाकरेंच्या जुन्या शिलेदाराला उतरवलं मैदानात

Akshay Sabale

Mumbai News : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ( mumbai north north west lok sabha ) उमेदवारीबाबत शिवसेनेत तिढा कायम होता. पण, हा तिढा शिवसेनेनं सोडवला आहे. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेनं रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी लढत होणार आहे. येथून ठाकरे गटानं अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे.

रवींद्र वायकर ( Ravindra Vaikar ) यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. वायकरांच्या उमेदवारीला मित्रपक्षातील काही जणांकडून विरोध होता. पण, अखेर वायकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काही महिन्यांपूर्वी वायकरांनी उद्धव ठाकरेंची ( Uddhav Thackeray ) साथ सोडत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी माघार घेतल्यानंतर मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील उमेदवारीबाबत बराच खल सुरू होता. येथून अभिनेता गोविंदा यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. पण, सोमवारी रात्री रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी चर्चेसाठी गेले होते. या वेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या बैठकीअंती वायकर यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं आहे.

दरम्यान, अमोल कीर्तिकर यांना उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली होती. कीर्तिकरांकडून प्रचाराला सुरुवातही झाली आहे. वायकर हे जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. वायकरांचं या परिसरात वर्चस्वदेखील आहे. त्यामुळे येथे अमोल कीर्तिकर विरुद्ध वायकर अशी लढत होणार आहे. पण, भाजपच्या नेत्यांनी वायकर यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते वायकर यांच्या प्रचारात उतरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT