Keshav Upadhye News : Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : ठाणे-कल्याणची उमेदवारी अजूनही का अडली? उपाध्ये म्हणाले...

Keshav Upadhye News : प्रत्येक पक्षाला वाटते की आपलाच उमेदवार असावा, पण एकदा निर्णय झाला की भाजपचे कार्यकर्ते काम करत असतात.

Pankaj Rodekar

Mumbai News : "आमची मने आणि मतेही जुळलेली असून, लवकरच महायुतीच्या ठाणे, कल्याण, पालघर येथील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. या शिवाय जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपमध्ये कुठेही बंडखोरी झाली असे म्हणता येणार नाही. मात्र, पाटील यांनी असा निर्णय घ्यायला नको होता," असेही उपाध्ये म्हणाले. "या उलट महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे त्यांना यश येणार नाही," असेही मत उपाध्य यांनी बुधवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. (Lok Sabha Election 2024)

'भारतीय जनता पार्टी बूथ वरचा नारा देत वेगळा विचार घेऊन पुढे येत आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपला जी मते मिळाली होती, त्यामध्ये वाढच होणार आहे. भाजप 370 + जागा जिंकेल. याकरिता भाजप बूथ व्हिजन अभियान राबवणार असल्याचे उपाध्ये म्हणाले. घरोघरी जाऊन भाजपचे कार्यकर्ते पत्र देणार आहेत,' असेही उपाध्ये म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रत्येक घरावर आणि गाडीवर स्टिकर लावण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर भाजपचा झेंडा लावला जाईल. 4 ते 9 एप्रिलपर्यंत हे अभियान सुरू असेल. या काळात जो भाजपचा मतदार नाही त्यांचेही मन भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच जिथे महायुतीचा उमेदवार आहे, तिथे त्यांचा प्रचार करणार आहे, असे केशव उपाध्ये (Keshav Upadhye) आहे.

ठाणे, कल्याण, पालघर या लोकसभा मतदारसंघाच्या (Lok Sabha) उमेदवारीबाबत चर्चा करून तोडगा निघेल. प्रत्येक पक्षाला वाटते की आपलाच उमेदवार असावा. पण एकदा निर्णय झाला की भाजपचे कार्यकर्ते काम करत असतात. भाजपचे नेतृत्व जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल, असे उपाध्य म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT