arvind sawant | aaditya thackeray sarkaranama
मुंबई

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना विधानसभेचा गड कठीण; वरळीतून अरविंद सावंतांना फक्त 'एवढी'च मते!

Akshay Sabale

Mumbai News, 7 June : शिवसेनेतील बंडानंतर फुटीरांना जागा दाखवून देण्याच्या इर्षेनं पेटलेल्या आदित्य ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत करिष्मा दाखवला. शिवसेनेकडे फार काही नसताना 9 जागा जिंकल्या. मुंबई आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आपली ताकद दाखवून दिली.

आदित्य ठाकरे ( aaditya Thackeray ) यांच्या वरळीत मतदारसंघाचा समावेश असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत जिंकून आले. हा मतदारसंघात जिंकल्याचा ठाकरेंना प्रचंड आनंद झाला आहे. तरी, आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाचा वाटा काही हजारांचा आहे. म्हणजे यामिनी जाधव यांनी मिळवलेल्या मतांच्या तुलनेत सावंताना फक्त सहा हजार मतांच लीड वरळीतून मिळालं आहे.

याआधी आदित्य ठाकरेंना वरळीतून हरविण्याचा चंग भाजपनं बांधला आहे. परिणामी दक्षिण मुंबईत 'मशाल' पेटली असली तर वरळीत मात्र आदित्य ठाकरे यांना डोकं खाजविण्याइतपत मते मिळाली आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत आदित्य ठाकरे वरळीतून लढणार की

याआधी आदित्य ठाकरेंना वरळीतून हरविण्याचा चंग भाजपनं बांदला आहे. परिणामी दक्षिण मुंबई मशाल पेटली असली तरी वरळीत मात्र आदित्य यांना डोकं खाजिवण्याइतपत मते मिळाली आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत वरळीतून लढणार की अन्य 'सेफ' मतदारसंघ निवडणार, याकडे नजरा राहणार आहेत.

दक्षिण मुंबई मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आपली मते राखलीच, पण शिवाय काँग्रेसला साथ देणार मतेही मिळाली आहेत. विशेष म्हणजे यामिनी जाधव ज्या मतदारसंघातून निवडून आल्या, त्या मतदारसंघातच तब्बल 46 हजारांची आघाडी मिळाल्यानं सावंतांचा विजय सुकर झाला. तर यामिनी जाधवांना पराभवाचा सामना करावा लागला.

कोणत्या आमदारांच्या मतदारसंघातून कोणाला मिळाली किती मते?

विधानसभा आमदार अरविंद सावंत यामिनी जाधव

वरळी | आदित्य ठाकरे | 64,844 | 58,129

शिवडी | अजय चौधरी | 76,053 | 59,150

भायखळा | यामिनी जाधव | 86,883 | 40,817

मलबार हिल | मंलगप्रभात लोढा | 39,573 | 87,860

मुंबादेवी | अमिन पटेल | 77,469 | 36,690

कुलाबा | राहुल नार्वेकर | 48,913 | 58,645

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT