Palghar Loksabha Constituency Sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : पालघरमध्ये वाढलं मतदारांचं 'बळ'; उमेदवारांच्या पायाला लागणार भिंगरी

सरकारनामा ब्यूरो

संदीप पंडित

Virar News :

लोकसभा निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागू शकते, अशी स्थिती आहे. तत्पूर्वी मतदार याद्या अपडेट करण्याचे काम करण्यात आले आहे. यात पालघर जिल्ह्यातून मोठी अपडेट समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यात या वेळी 2 लाख 77 हजार मतदार वाढले आहेत. आता पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या 20 लाख 89 हजार 710 झाली आहे. लोकसभेतील सहापैकी पालघर मतदारसंघात सर्वात कमी मतदारांची नोंदणी झाली आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात (Palghar Loksabha Constituency) विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. यापैकी हितेंद्र ठाकूर (वसई), क्षितिज ठाकूर (नालासोपारा) आणि राजेश पाटील (बोईसर) हे बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत, तर पालघरमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा (शिंदे), विक्रमगडमध्ये सुनील भुसारा (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) आणि डहाणूमध्ये कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोल निवडून आले आहेत. एकूणच सहापैकी तीन मतदारसंघात बहुजन विकास आघाडीची ताकद आहे.

'बहुजन'च्या तीन मतदारसंघांतील मतदारांची संख्या 12 लाख 32 हजार 74 आहे. तर उर्वरित तीन मतदारसंघात 8 लाख 57 हजार 636 मतदार आहेत. त्यामुळे वाढलेले मतदार कुणाचं पारडं जड करणार, याची उत्कंठा वाढली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 12 हजार 983 मतदार होते. यंदा मतदारांची संख्या 20 लाख 89 हजार 710 झाली आहे. सर्वाधिक मतदार नालासोपारा विधानसभा मतदारसंघात वाढले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत 2019 मध्ये किती मतदार होते आणि या वेळी त्यात किती वाढ झाली आहे, पाहूया

128 - डहाणू विधानसभा मतदारसंघ

आधी - 2 लाख 80 हजार 596 मतदार

नव्या मतदारांची वाढ - 15 हजार

129 - विक्रमगड विधानसभा मतदारसंघ

आधी - 3 लाख 1 हजार 635 मतदार

नव्या मतदारांची वाढ - 42 हजार

130 - पालघर विधानसभा मतदारसंघ

आधी - 2 लाख 75 हजार 405 मतदार

नव्या मतदारांची वाढ - 10 हजार

131 - बोईसर विधानसभा मतदारसंघ

आधी - 3 लाख 69 हजार 448 मतदार

नव्या मतदारांची वाढ - 84 हजार

132 नालासोपारा मतदारसंघ

आधी - 5 लाख 35 हजार 83 मतदार

नव्या मतदारांची वाढ - 83 हजार

133 - वसई मतदारसंघ

आधी - 3 लाख 27 हजार 543 मतदार

नव्या मतदारांची वाढ - 44 हजार मतदार

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT