Raj Thackeray Traffic Statement: देशभरात सध्या वाहतूककोंडीनं अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत, यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वाहतूक सेनेच्या मेळाव्यात एक महत्वाचं भाकीत केलं आहे. देशातील रस्ते वाहतुकीबाबतची भीषण अवस्था त्यांनी यावेळी कथन केली. तसंच वाहतूककोंडीची बिकट स्थिती सुधारण्यासाठी आपणं सरकारकडं काही प्रश्न उपस्थित केले आणि त्याची अंमलबजावणी झाली याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
राज ठाकरे म्हणाले, माझा प्रत्यक्ष संबंध हा फक्त वाहतुकीशी येतो. माझ्या भाषणांमध्ये मी अनेकदा वाहतुकीच्या प्रश्नांवर बोललो आहे. पण आता विषय झाला की सरकारतर्फे ई-चलानविरोधात वाहतूकदारांचं काही म्हणणं आहे. याला काही कोणाचा विरोध नाही पण हे ई-चलान ज्या पद्धतीनं लावले जातात ते तपासलं पाहिजे. याची व्यवस्था पारदर्शी असली पाहिजे.
राज ठाकरेंनी सांगितलं की, एका फ्रेन्च लेखकानं एकदा म्हटलं होतं की, तुमच्याकडील लहान मुलं कोणती गाणी गातात त्यावरुन मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. आपल्याकडील मुलं जर बिडी जलंय ले...अशी गाणी गात असतील तर देशाचं भविष्य काय असेल? तसंच मला या देशातलं ट्राफिक बघितल्यानंतर या देशाचं वर्तमान आणि भविष्य दिसतं. कारण आम्हाला माहितीच नाही की, गाड्या पार्क कुठे करायच्या? हे सरकारलाही माहिती नाही. त्याला कुठलाही आकार उकार राहिलेला नाही.
ट्राफीकचा देशात गांभीर्यानं विचार होता कुठेही दिसत नाही. हायवेनं जात असताना अनेकदा जड वाहतूक हे उजव्या बाजुनं चालतात त्यांनी खरंतर डाव्या बाजूनं चालायला हवं हा कायदा आणि नियम आहे पण कोणीही ते पाळत नाही. रस्त्याच्या कॉर्नरला गाड्या पार्क करु नयेत हा कायदा आहे नियम आहे पण कोणीही पाळत नाही. माणसाचं काम कमी व्हावं म्हणून यंत्र आली पण ट्रॅफिक सिग्नल हा पोलिसांचं काम कमी व्हावं म्हणून आली पण त्या चौकात सिग्नल असतो आणि पोलिसही असतो. मग याचा उपयोग काय?
मुंबई आधी रात्री १ वाजताही सिग्नलला गाड्या थांबायच्या आता दुपारीही थांबत नाहीत. दुचाकी चालवणाऱ्यांना तर वाटतं की हा सिग्नल आपल्यासाठी नाहीच, तो फक्त चारचाकींसाठीच आहेत. याबाबत मी मागं एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, महापालिकेच्या आयुक्तांना सांगितला पण पुढे काहीही झालं नाही सर्वकही ढिम्म आहे. मी सांगितलं होतं की, फुटपाथच्या इथं नो पार्किंगचा बोर्ड लावतात तो दिसत नाही. पण त्याऐवजी जर नोपार्किंग आहे तिथला फुटपाथ काळ्या आणि लाल रंगात रंगवा आणि जिथं काळ्या आणि पिवळ्या रंगात रंगवला आहे, ते लोकांना कळायला सोप जातं. त्यानंतर प्रशासनानं कुठेतरी दादरमध्ये हे काम केलं. पण लोकांना हे कधी सांगणार याच्या जाहिराती दिल्या पाहिजेत.
एखाद्या शहराच्या क्षेत्रफळानुसार १५ टक्के रस्ते असले पाहिजेत. पुण्यात शहराच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत केवळ ७ टक्के क्षेत्र आहे. आपल्याकडं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाऊन प्लॅनिंग होत नाही. त्यामुळं याचा सर्व बोजवारा उडतो. आपल्याकडं शहरांना आकारच राहिलेला नाही, फुटपाथवर चालता येत नाही. बागा नाहीत, चांगली मैदानं नाहीत आणि सांगायचं काय तर ७.८ टक्के आमचा जीडीपी झाला मग तो काय चाटायाचा आहे? अशा शब्दांत राज ठाकरेंनी सरकारच्या दाव्यांवरही टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.