Maharashtra bandh Mahavikas aghadi Sarkarnama
मुंबई

Badlapur Rape Case : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

Jagdish Patil

Badlapur Rape Case Update : बदलापूर अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये आघाडीतील सर्व पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

बदलापुरातील एका नामांकीत शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजन घटना उघडकीस आल्यापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. याच घटनेवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं आहे.

राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून हे सरकारचं अपयश असून या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे.

अशातच आता महाविकास आघाडीकडून बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदती घोषणा करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय बदलापूर प्रकरणी झालेल्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) बैठकीत घेण्यात आला आहे.

"बदलापूर (Badlapur) अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. येत्या 24 तारखेला आम्ही बंदची हाक आम्ही दिलेली आहे. यामध्ये सर्व मित्रपक्ष सहभागी होणार आहेत. तर शाळा कॉलेज, डॉक्टर, दुकानदार आणि शाळेतील मुलामुलींच्या पालकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं", असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT