Baghel and Darekar Sarkarnama
मुंबई

Praveen Darekar : ''सत्तेत राहून मुख्यमंत्री बघेल यांनी खेळला सट्टेबाजीचा खेळ, अन् ...'' दरेकरांचा गंभीर आरोप!

Betting App Case : ''सट्टेबाजी हा काँग्रेसच्या बघेल सरकारचा साइड बिझनेस'' असंही दरेकर यांनी म्हटले आहे.

Mayur Ratnaparkhe

Chhattisgarh CM Bhupesh Baghel News : भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर टीका करत, मोठा आरोपही केला आहे. मुख्यमंत्री बघेल यांनी ''सत्तेत राहून सट्टेबाजीचा खेळ खेळला आणि त्यातून कमावलेला पैसा विधानसभा निवडणुकीसाठी वापरला आहे,'' असं दरेकर म्हणाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

''सट्टेबाजीच्या ॲपचे प्रवर्तकांनी मुख्यमंत्री बघेल, यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याची धक्कादायक माहिती काल 'ED'च्या तपासात उघड झाली. या घोटाळ्याला काँग्रेसच्या बघेल सरकारचा पाठिंबा आहे, असे भाजप पहिल्यापासून सांगत होती. आता हे बिंग फुटले असून, बघेल याना एकूण ५०८ कोटी रुपये देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे,'' असे दरेकर यांनी सांगितले.

याशिवाय दरेकर म्हणाले की, ''विकासाच्या बाता करणाऱ्या काँग्रेसच्या बघेल सरकारचा विकासाचा बुरखा टराटरा फाटला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महादेव ॲपच्या प्रवर्तकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम छत्तीसगडमध्ये पोहाेचवली जात असल्याची गुप्त माहिती अंमलबजावणी संचालनालयाला ( ईडी ) मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल ट्रायटन आणि अन्य ठिकाणी झडती घेतली.''

सट्टेबाजी काँग्रेसच्या बघेल सरकारचा साइड बिझनेस -

तसेच ''काँग्रेस पक्षाच्या निवडणूक खर्चासाठी मोठी रक्कम पोहोचवण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीतून पाठवलेला कॅश कुरिअर असिम दास याला अटक करून त्याच्या घरातून ५.३९ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री बघेल यांना द्यायची होती, असे दासने मान्य केल्याचेही ‘ईडी’ने म्हटले आहे.

यावरून सट्टेबाजी हा काँग्रेसच्या बघेल सरकारचा साइड बिझनेस असून, बघेल यांनी छत्तीसगडच्या विकासाला बेटिंगवर पणाला लावले,'' अशी टीकाही आमदार दरेकर यांनी केली.

१४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल -

'ईडी'ने महादेव ॲपच्या काही बेनामी बँक खात्यांतून १५.५९ कोटी रुपयांची शिल्लक रक्कम गोठवली आहे. यापूर्वीच ४ आरोपींना अटक केली आहे आणि ४५० कोटींहून अधिक रुपयांची गुन्हेगारी रक्कम जप्त केली आहे.

या प्रकरणी १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सट्टेबाजी सिंडिकेटचे प्रवर्तक परदेशात बसून मित्र व सहकारी यांच्या मदतीने भारतभर हजारो पॅनेल चालवत आहेत आणि त्यांनी त्यातून हजारो कोटी रुपये कमावले आहेत, असेही दरेकर यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT