Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News: गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा नंबर वन; फडणवीस म्हणाले, "विरोधकांनी आता तरी..."

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra News : परदेशी गुंतवणुकीत तीन वर्षानंतर महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकवर आला आहे. परदेशी गुंतवणूक सर्वात जास्त महाराष्ट्रात आल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उद्योग राज्याबाहेर गेले असे विरोधक म्हणत होते. त्यांना या अहवालातील आकडेवारीने चोख उत्तर दिले आहे. त्यामुळे विरोधकांनी आतातरी आपली तोंडे बंद करावीत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.

मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी परदेशी गुंतवणुकीबाबत महत्वाची माहिती दिली. ही माहिती देताना त्यांनी विरोधकांना निशाणाही साधला. फडणवीस म्हणाले, "पंप स्टोरेजच्या संदर्भात १३ हजार ५०० मेगावॅटचे करार करण्यात आला आहे. हा करार केंद्र सरकारची एनएचपीसी आणि खासगी कंपनी टॉरेंट पॉवर या दोन कंपन्यात झाला आहे. या करारातून ७१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर ३० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे." (FDI in Maharashtra)

फडणवीस यांनी यावेळी पंप स्टोरेजचे महत्वही सांगितले. ते म्हणाले, "आता जागतिक स्तरावर रिन्यूएबल एनर्जीमध्ये पंप स्टोरेज ही अत्यंत महत्वाची व्यवस्था आहे. त्यात सोलर वीजेचा वापर करून खालच्या जलाशयातून पाणी उचलून वरच्या जलाशयात सोडले जाते. रात्रीच्या वेळी ते पाणी खाली आणून टर्बाइनच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. यातून २४ तास अपांरपारिक उर्जा कमी किमतीत मिळते. या प्रकारात एका मिनिटात वीज सुरू करता येते आणि आवश्यकता नसेल तर थांबवताही येते. त्यामुळे पंप स्टोरेज हा प्रकार जगभरात स्वीकारला जात आहे. त्यामुळे हा करार खूप महत्वाचा आहे."

यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना तोंडे बंद करण्याचा इशाराही दिला. फडणवीस म्हणाले, "राज्यात परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत आहे. 'एफडीआय'च्या आकडेवारीनुसार २०२०-२१ मध्ये गुजरात (Gujrat) तर २०२१-२२ मध्ये कर्नाटक (Karnataka) पहिल्या क्रमांकावर होते. आता आमचे सरकार आल्यापासून पुन्हा तीन वर्षांनी महाराष्ट्र राज्य परदेशी गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आले आहे. ते आता आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. आता हे आकडे पाहिल्यानंतर जी लोकं उद्योग बाहेर राज्यात गेल्याची टीका करत होते त्यांनी आतातरी आपली तोंडे बंद केली पाहिजेत."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT