Mumbai News : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये कार्यवाही करण्याच्या पवित्र्यात आले आले आहेत. आमदार अपात्रतेमध्ये नव्याने वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ऐन दिवाळीच्या सुट्यांमध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे. नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानच ही सुनावणी घ्यावी लागणार आहे . यामुळे अध्यक्षांची तारेवरची कसरत पाहायला मिळणार आहे. (Latest Marathi News)
हिवाळी अधिवेशनादरम्यान एकीकडे सभागृहाचं कामकाज अध्यक्षांकडे असणार आहे, तर त्याच वेळी शिवसेना अपात्रता प्रकरणावरही त्यांना सुनावणी पार पाडावी लागणार आहे. या दोन्ही गोष्टींची कार्यवाही करताना अध्यक्षांची हिवाळी अधिवेशनात तारेवरची कसरत होणार आहे.
या पार्श्वभूमीवरच राहुल नार्वेकर यांनी रविवारी दिल्लीत जाऊन सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेतली होती. या भेटीत आमदार अपात्रते प्रकरणासंदर्भात कायदेशीर सल्ला नार्वेकरांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विलंब केल्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेले वेळापत्रक न्यायालयाने अमान्य केले होते. यासाठी आता नवीन वेळापत्रकासाठी अध्यक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
जुने वेळापत्रका नाकारून, नवे वेळापत्रक जाहीर करण्यासंदर्भात निर्देश देतानाचा न्यायालयाने राहुल नार्वेकर यांच्यावर कडक ताशेरे ओढले आहेत. तसेच, आमदार अपात्रतासंदर्भातील ३१ डिसेंबर पर्यंत ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेशही अध्यक्षांना दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.