Eknath Khadse News : Maharashtra Assembly : MangalPrabahat lodha
Eknath Khadse News : Maharashtra Assembly : MangalPrabahat lodha  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Assembly | "40 आमदारांचे लाड पुरवले.." : खडसेंच्या वक्तव्यावर मंत्री लोढा कडाडले; काय घडलं नेमकं?

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Assembly : अधिवेशन सुरू असताना विधानपरिषेदेच्या सभागृहात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार केला. अर्थसंकल्पामध्ये शिंदेंच्या ४० आमदारांचे लाड पुरवण्यात आले, असे खडसे म्हणाले. मात्र खडसेंच्या याच विधानावरसत्ताधारी आमदारांनी जोरदाप आक्षेप घेतला आहे. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा आणि एकनाथ खडसे यांच्यात चांगलीच जुंपल्याचे दिसून आले. यानंतर सभापतींनी हस्तक्षेप करत दोन्ही नेत्यांना शात राहण्याचं आवाहन केले.

काय घडलं नेमकं?

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे गटाच्या ४० आमदारांचे लाढ पुरवण्यात येत आहेत. इतरांच्या तुलनेत ४० आमदारांच्या मतदारसंघात विकासकामे मंजूर करून दिले जात आहेत. हा अर्थसंकल्प म्हणजे, ४० आमदार यांचे लाड पुरवण्यात आले आहे, असे खडसे म्हणाले.

तसेच, अर्थसंकल्पामध्ये शिंदेंच्या चाळीस आमदारांना झुकंत माप देण्यात आल्याने, भाजपचेच अनेक आमदार नाराज आहेत. ते जाहीरपणे नाही, पण खासगीत त्यांची नाराजी बोलून दाखवतात. आम्हाला १० कोटीच देतात आणि शिंदेंच्या आमदारांना मात्र २० - २० कोटी दिले जातात, असं भाजपचेच आमदार सांगतात, असे खडसे म्हणाले होते.

खडसेंच्या विधानावर सत्ताधाऱ्यांकडून आक्षेप :

एकनाथ खडसे यांच्या '४० आमदारांचे लाड' या वक्तव्यांवर भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. "कोणत्याही पक्षाचे आमदार जर प्रस्ताव घेऊन मंत्र्यांकडे येत असतील, तर ती गोष्ट पाहून मंत्री त्यावर आपला शेरा लिहितात, हे खडसेंना ज्ञात आहे. ते सुद्धा सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे ४० आमदारांचे लाड पुरवले गेले, हे खडसेंचं वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे, " असे लोढा म्हणाले.

दरम्यान, दोन्ही नेत्यांची खडाजंगी झाल्याने इतर आमदारांनी घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर सभापती नीलम गोऱ्हे यांनी हा वाद विकोपाला जाऊ दिले नाही. दोन्ही नेत्यांना त्यांनी शांत राहण्याचं आवाहन केलं. तसेच खडसेंचे भाषण होईपर्यंत कोणीही मध्ये बोलू नये, असे त्यांनी खडसावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT