Ajit Pawar Assembly Budget Live  Sarkarnama
मुंबई

Budget Live : मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजितदादा चिडले ; फडणवीसांची दिलगिरी ; "जनाची नाही तर मनाची.."

Ajit Pawar Assembly Budget Live : आज फक्त मंगलप्रभात लोढांचा लक्षवेधी झाली,

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar Assembly Budget Live : विधीमंडळाचे आजचे (बुधवारी) कामकाज सुरु होताच विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभेत कामकाज सुरु झाले तेव्हा सात मंत्री अनुपस्थित होते. यावरुन अजित पवार यांनी सरकारला जाब विचारला.

मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ आली. आज आठ लक्षवेधी होत्या, मंत्री उपस्थित नसल्याने सात लक्षवेधी पुढे ढकलण्यात आल्या.

मंत्रीपदासाठी पुढे पुढे करणारे सभागृहात गैरहजर राहतात. यांना जनाची नाही निदान मनाचीही लाज वाटत नाही का? असा कडवा सवाल विचारत अजित पवारांनी मंत्र्यांच्या निर्लज्जपणा आणि निष्काळजीपणावरही ताशेरे ओढले.

अजित पवार यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. "अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही,आम्ही मंत्र्यांना समज देऊ," असे फडणवीस यांनी सांगितले.

सभागृहात केवळ एकाच लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी एकच मंत्री उपस्थित इतर लक्षवेधीसाठी मंत्री अनुपस्थित असल्यामुळे अजित पवार संतापले.

"संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील आज सकाळच्या सत्रांत उपस्थित नसल्यानेही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्रीपद घेताना पुढे पुढे करायचं आणि सभागृहात हजर राहायचं नाही. जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटत नाही का? अतिशय गलिच्छपणाचं काम सुरू आहे," असे पवार म्हणाले. 

"मंत्र्यांनी जर जबाबदारी घेतली आहे, तर त्यांनी सभागृहात येऊन बसायला पाहिजे. आज फक्त मंगलप्रभात लोढांचा लक्षवेधी झाली, जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे," अशा शब्दात अजित पवारांनी अनुपस्थित मंत्र्यांविषयी संताप व्यक्त केला.

काल विधिमंडळ अधिवेशनातील भाषणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटल यांनी शेतकरी आत्महत्या, रोजगार, महिला, वंचितांच्या प्रश्नांवरून चांगलीच फटकेबाजी केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोलेही लगावले.

यासह जाहिरातीवरून सरकारची कानउघडणीही केली आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला सहकार्य करीत नसल्याचा मुद्द्यावरूनही भाजपला सुनावले आहे.

जयंत पाटील यांनी राज्य सरकार हजार कोटी रुपये फक्त जाहिरातीवर खर्च करीत असेल तर राज्याचे भविष्य अवघड असल्याची खंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी एक वृत्तपत्र काढून त्यावरील जाहिरातच सभागृहात दाखविली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT