Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच छोटछोट्या घटक पक्षांसाठी अस्तित्त्वाची लढाई ठरणार आहे. मतदानानंतरच्या वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये युती आणि आघाडीमध्ये सत्तेसाठी काँटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला (Maharashtra Assembly Election 2024) त्रिशंकू की स्थिर सरकार मिळणार याविषयी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
विधानसभा 2019 च्या निवडणुकीनंतर गेले पाच वर्ष राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.पाच वर्षांत दोन सरकारं पाहायला मिळाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन बलाढ्य पक्ष फुटले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.
त्यामुळे उद्याच्या निकालात महायुती आणि महाविकास आघाडीला बहुमतातलं स्थिर सरकार मिळणार की राज्याच्या पदरी पुन्हा एकदा त्रिशंकू सरकार पडणार याचं उत्तर शनिवारी (ता.23) लागणार्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलनंतर महाराष्ट्राच्या निकालाबाबत अनेक अंदाज व्यक्त वर्तविण्यात येत आहेत. यात सुरुवातीला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याचं बोललं जात असून त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
काही एक्झिट पोलमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात इलेक्टोरल एजनुसार, महाविकास आघाडीला 150 जागा तर महायुती (Mahayuti) 118 जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली आहे. तर इतरांना 20 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे. इलेक्टोरल एजनुसार, राज्यात महाविकास आघाडीला 150 जागा मिळू शकतात. तर भाजपसोबत महायुतीला 118 जागा मिळू शकतात. 20 जागा इतरांच्या खात्यात जात आहेत.
भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीला 127 ते 135 तर काँग्रेस आघाडी 147-155 जागा मिळू शकतात असा अंदाज SAS च्या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.तसेच इतरांना 10-13 जागा मिळताना दिसत आहेत.
MATRIZE च्या एक्झिट पोलमध्ये महायुती सरकारला मोठं बहुमत मिळणार असल्याची शक्यता आहे. त्यात महायुतीला 150-170 आणि महाविकास आघाडीला 110-130 व इतरांना 8-10 जागा मिळण्याच अंदाज व्यक्त केला आहे.
निकालाला काही तास राहिलेले असताना 'सी व्होटर'चा झोप उडवणारा सर्व्हे समोर आला आहे. या पोलच्या आकडेवारीनुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मतांचं अंतर केवळ एक टक्का असणार आहे. त्यांच्यामधील जागांचे अंतर केवळ आठ जागांची असणार आहे. तर 61 जागांवर अगदी अटीतटीच्या लढती होणार असल्याची माहिती समोर येत आहे
महायुतीला 112 जागा तर महाविकास आघाडीला 40 टक्के मतांसह 108 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तब्बल 61 जागांवर अगदी घासून लढत होईल. त्यामुळे कवणाची सत्ता येणार हे पाहण्यासाठी मतमोजणी पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार आहे. याच 61 जागा राज्याची सत्ता कुणाच्या हाती द्यायची यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पडणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या या निवडणुकीत अपक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.एक्झिट पोलमध्ये अपक्ष युती व आघाडीची झोप उडवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.शेतकरी कामगार पक्ष,मनसे,वंचित,रासप, प्रहार, स्वराज्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांसह अपक्षांना
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.