Eknath Shinde Latest Marathi News, Devendra Fadnavis Latest News Sarkarnama
मुंबई

एकनाथ शिंदे असं काही बोलू लागले की फडणवीसांना सांगावं लागलं, सगळं उघड करू नका!

एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय राऊतांसह काँग्रेस-राष्ट्रवादीचाही समाचार.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विश्वासदर्शक प्रस्तावावर बोलताना जोरदार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांसह (Sanjay Raut) काँग्रेस-राष्ट्रवादीचाही समाचार घेतला. त्यांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवावरही भाष्य केलं. (Eknath Shinde Latest News)

राज्यसभेचे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, अशी फिल्डींग लावली होती. काँग्रेस व राष्ट्रवादीशी चर्चा करून त्यांना 42 चं मत घ्या, असं सांगितलं होतं. पण काँग्रेसनं 44 मतं घेतली, राष्ट्रवादीनं 43 घेतली. आमचीही मतं सर्व जागेवरच होती. पण मग नेमकं काय झालं, अशा प्रश्न पडला, असं शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर फडणवीसांकडे बोट दाखवत त्यांनी हा कलाकार तिकडं बसला होता, असं शिंदे म्हणाले.

शिंदे एक-एक पत्ते खुले करू लागल्याने फडणवीसांनी सगळं उघड करू नका, असं सांगितलं. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला. पण शिंदे बोलायचे थांबले नाहीत. आमचे दोन्ही उमेदवार निवडून यायला हवी होती. संजय पवारांना बाहेरून तीन मतं मिळवून दिली. सुनील प्रभू, अनिल परबांनीही ते पाहिले, असं शिंदे म्हणाले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत तर मला बाहेरच काढलं होतं. दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यादिवशी माझी सरकली होती. पडला तर गद्दारी केली असं म्हणतील. मी काहीही प्लॅनिंग केले नव्हते. सगळं काही बोलत बोलत गेलो. बंडावेळी आयजीला नाकाबंदी करायला सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं, हे मलाही माहिती होतं, असं शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान अजित पवारांचेही कौतुक केले. ते सकाळी सात वाजताच काम सुरू करत होते. माझ्या विभागाच्याही बैठका घेत होते. पण मी काही बोलत नव्हतो. कारण ते काम करत होतं, असं शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT