Rahul Shewale News in Marath
Rahul Shewale News in Marath  sarkarnama
मुंबई

Maharashtra Assembly Live : आदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या राहुल शेवाळेंची SIT चौकशी होणार

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Assembly Live : शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी काल (बुधवारी) संसदेच्या अधिवेशनात माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू (Sushant Singh Rajput) प्रकरणात राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

याप्रकरणाचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. मनीषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. सभापती नीलम गोऱ्हे यांनी शेवाळेंच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा केली.

राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. याप्रकरणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राहुल शेवाळे यांच्या आरोपांवर हरकत घेतली. तसंच, सभापतींकडे विनंती करून राहुल शेवाळेंनी केलेले आरोप संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहे.

सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) A U नावाने 44 फोन आले होते, हा A U म्हणजे आदित्य-उद्धव (Aditya Uddhav Thackeray) असल्याची बिहार पोलिसांनी (Bihar Police) माहिती दिल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला होता.

नितेश राणे म्हणाले, "सुशांत मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे नाव का घेतलं जातं. फक्त त्यांचेच नाव का घेतलं जाते. एकेकाळी राहुल शेवाळे हे मातोश्रीचे लाडके होते. त्यांनीच हा विषय काढला आहे. शेळके सांगतात की रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांचे 42 कॉल झाले आहेत," "या प्रकरणातील तपास अधिकारी का बदलला," असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

"सुशांत यांची माजी व्यवस्थापिका दिशा सालियन मृत्यूची केस पुन्हा ओपन करा. दिशाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट अद्यापही बाहेर आलेला नाही, त्यामुळे आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट केली तर सत्य समोर येईल. ज्याप्रमाणे श्रद्धा वालकर हिच्या खूनप्रकरणी आफताब पुनावाला याची नार्कोटेस्ट होते तशीच आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा," असे नितेश राणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT