ACB trap Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातमध्ये काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने धाड टाकली होती. या धाडीत कार्यालयातील लिपिकाला अटक करण्यात आली. हे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात गाजत आहे. विरोधकांकडून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात आहे. त्यावर आज त्यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले.
महाराष्ट्र लाचलुचपतमध्ये नंबर वन असल्याचे आरोप विरोधकांकडून केला जातो. त्यावर विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले, आपल्या राज्यात आपण याबाबत झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवली आहे. देशात सर्वात जास्त एसीबीचे छापे महाराष्ट्रात पडतात. हे सुरूच राहणार आहे. कारण तक्रार आली की त्याचे व्हेरिफिकेशन करायची आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई करायची.
कुणीतरी म्हटले मंत्र्यांना अधिकारी आहे की नाही, त्यांच्या कार्यालयात कशी कारवाई करता. माझ्याही कार्यालयातील एखाद्याची तक्रार आली तर एसीबी त्याला मला न विचारता ट्रॅप करू शकते. एसीबीला तो अधिकार आहे, आम्ही तो अधिकार दिला आहे. त्यामुळे मंत्री किंवा इतर असा कोणताही भेदभाव नाही, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
एसीबी हा स्वतंत्र विभाग आहे. त्यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांच्या व्हेरिफिकेशनच्या पध्दतीनुसार जर प्राथमिक तथ्य आढळलं तर ते ट्रॅप करतात. या ट्रॅपसाठी त्यांना कुठल्याही मंत्र्याची, गृहमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागत नाही. त्याची गरज देखील नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राजीनाम्याची मागणी
विरोधकांकडून नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत झिरवाळ यांनी मंत्रिपद सोडावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली. तर झिरवाळ यांनी या लाच प्रकरणाचीशी आपला काहीही संबंध नसल्याचे झिरवाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.