Yashomati Thakur : Varsha Gaikwad : Suresh Khade
Yashomati Thakur : Varsha Gaikwad : Suresh Khade Sarkarnama
मुंबई

Maharashtra Assembly News: महिला दिनीच विधानसभेत महिला आमदार कडाडल्या : काय आहे कारण?

सरकारनामा ब्यूरो

Yashomati Thakur News: शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन आठ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र एकाही महिलेला सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. यावरुन विरोधकांकडून वारंवार सरकारवर सडकून टीका केली जात आहे. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून, महिलांना विधानसभेत बोलण्यासाठी प्राधान्य देणार येणार असल्याची बाब पुढे येत होती, मात्र यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात यावरून खडाजंगी दिसून आली.

महिला आमदारांचे भाषण लक्षपूर्वक ऐकले जात नाही. महिलांनी मांडलेल्या मुद्द्यांचे नोटींग केले जात नाही, महिला प्रतिनिधी बोलता असताना, सभागृहात महिला बालविकास मंत्रीच उपस्थित नसल्याचे, विरोधक महिला आमदारांनी सांगितले.

काँग्रेसच्या महिला आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या की, "एकीकडे महिला आमदार बोलत असताना, त्याची नोंद कोणीही घेत नाही. दुर्दैवाने हा एक सोपस्कार होऊन जातो. महिला दिन आहे, महिलांना भाषण करायला द्या पण, महिलांनी भाषण करायचं आणि त्यांना ऐकायचं पण नाही. असं थोडी आहे.

खरंतर महिला बालविकास मंत्री इथे उपस्थित असायला पाहिजे. समोरचे तीन मंत्री त्यांच्याच गप्पांमध्ये आहेत. आम्ही गांभीर्याने काही प्रश्न मांडतोय. महिला दिनाचा हा कार्यक्रम केवळ सोपस्कार राहता कामा नये. महिलांचे प्रश्नांमध्ये तुम्हीसुद्धा बोलला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. सोपस्कार म्हणून हा कार्यक्रम सोपस्कार राहता कामा नये. अशी उद्वीग्नतेने गायकवाड म्हणाले.

यानंतर काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, "एक तर महिला व बालकल्याण मंत्री याठिकाणी उपस्थित पाहिजे होते. ठिक आहे तुम्ही मोठ्या माणसाला महिला व बालकल्याण मंत्री केलेलं आहे, पण एक ही महिला मंत्री तुम्हाला बनवता, एकही मंत्री या ठिकाणी उपस्थित नाही. महिला आमदार होत असताना, कोणीही दखल घेत नाही.सरकार महिलांच्या विषयावर अजिबात गंभीर नाही. महिलांना डावलण्यात येत आहे. हा विषय नीट समजून घ्यावा, " अशी त्यांनी भूमिका मांडली.

यानंतर सरकारच्या वतीने मंत्री सुरेश खाडे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, महिला प्रतिनिधिंनी मांडलेली भूमिका गंभीर विषय आहे. आम्ही चार मंत्री इथे उपस्थित आहोत. तुम्ही मांडलेले मुद्दे लिहून घेतोय. आपल्यामध्ये ही महिलांसाठी किती गांभीर्य किती असावा, किती महिला आमदार आहेत याची ही चौकशी व्हावी, असे सरकारच्या वतीने खाडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT