Maharashtra BJP News: भाजप कार्यकारिणीला आज अखेर मुहूर्त मिळाला. कार्यकारिणी जाहीर न झाल्याने कार्यकर्ते नाराज होते. मनपा, झेडपी निवडणुकांमुळे नियुक्त्या रखडल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी सूत्र हाती घेऊन ८ महिने लोटले तरीही जुन्याच कार्यकारिणीमार्फत कामकाज सुरु होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह नावांवरील एकमत आणि इतर कारणामुळे नियुक्त्या रखडल्या होत्या. नव्या कार्यकारिणी बाबत दोनदा पाठवण्यात आलेला प्रस्तावावर केंद्राकडून दुरुस्त्यांसाठी परत पाठवण्यात आला. विधानसभेऐवजी परिषदेतील आमदारांना कार्यकारिणीत स्थान देण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाचा आग्रह होता.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील प्रदेश भाजपची कार्यकारिणी मंगळवारी जाहीर झाली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नव्या प्रदेश कार्यकारिणीला मंजुरी दिली आहे. 2029 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, नव्या कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
अतुल कासेकर
भारती पवार
संजय कोडगे
संजय भेंडे
रामदास तडस
केशव उपाध्ये
प्रवीण पोटे
गोपीचंद पडळकर
चेतन देशमुख
सुजय विखे पाटील
श्रीमती अर्चना चाकुरकर
निरंजन डावखरे
योगेश क्षिरसागर
संजय कुटे
माधवी नाईक
राजेश पांडे
सुनील राणे
प्रशांत ठाकूर
मंगेश चव्हाण
परिणय फुंके
वर्षा ढहाळे
संजय जगताप
रोहिणी नायडू
राम सातपुते
प्रवीण घुगे
रेखा कुलकर्णी
भैरवी वाघ
भाजपमधील जुने, निष्ठावंत कार्यकर्ते आणि इतर पक्षांतून आलेले नवे नेते यांच्यात पदे मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच होती. सर्वांना सामावून घेताना नेतृत्वाची दमछाक झाली. विधानसभा आमदारांना कार्यकारिणीत स्थान देऊ नये. त्याऐवजी विधान परिषदेच्या आमदारांकडे पुरेसा वेळ असल्याने त्यांना संघटनात्मक कामांसाठी वेळ देणे शक्य आहे, असा युक्तिवाद केला गेला. राज्यातील प्रत्येक विभागासाठी प्रभारी नेमावा, असा प्रस्तावही प्रदेश भाजपकडून पाठवण्यात आला होता. मात्र पक्षाच्या घटनेत तशी तरतूद नसल्याचे कारण देत केंद्रीय नेतृत्वाने हा प्रस्ताव फेटाळला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.