maharashtra budget 2022  sarkarnama
मुंबई

राष्ट्रवादीचे झिरवळ भाजपच्या गळाला ; मलिकांच्या राजीनाम्यासाठी सही..

सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाल्याने विरोधकांच्या मागणीला जोर येऊन घोषणाबाजी रंगली.

ज्ञानेश सावंत : सरकारनामा ब्युरो

मुंबई : सभागृहात आणि सभागृहाबाहेरही (maharashtra budget 2022) भाबडेपणात रमणारे विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ (narhari zirwal) हे शुक्रवारी एकाकीच विरोधी भाजपच्या प्रेम पडले आणि विरोधकांच्या सुरात सूर मिसळून, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या (Nawab Malik) राजीनाम्यासाठी झिरवाळ यांनी सही केली.

विरोधकांच्या स्वाक्षरी मोहिमेची कल्पना नसलेल्या झिरवाळांनी सही केली; आणि काही क्षणातच चूक कळताच कपाळावर हात मारून घेण्याची वेळी त्यांच्यावर आली. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाल्याने विरोधकांच्या मागणीला जोर येऊन घोषणाबाजी रंगली.

मलिक यांच्या जमीन व्यवहाराचा संबंध अंडरवर्ल्ड दाऊद इम्राहिमशी जोडून त्यांच्या राजीनाम्यावर अडून बसलेल्या विरोधकांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही आपली भूमिका कायम ठेवली. कामकाजाला सुरवात होण्याआधीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

मलिकांची राजीनाम्याची व्यापकता वाढविण्यासाठी विरोधकांनी स्वाक्षरी मोहीम घेतली. पायऱ्यांच्या शेजारीच उभारलेल्या फलकांवर भाजपचे आमदार सही करीत होते. त्याचवेळी विधानभवनात गडबडीत असलेले झिरवाळ हे पायऱ्यांजवळ आले आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांना फलकावर सही करण्याची विनंती केली. झिरवाळ यांनी क्षणाचाही विलंब न करता सही केली. झिरवळांच्या पाठिंब्याने खूष झालेल्या विरोधकांच्या घोषणाबाजीला जोर चढला.

मलिकांच्या राजीनाम्यावरून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात या मुद्यावरून ठाकरे सरकारला 'टार्गेट' केले मलिक यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे. मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजपने सरकारची कोंडी केली असली; मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. या मुद्यावरून सरकर-विरोधकांतील संघर्ष वाढत असतानाच झिरवळ यांच्या सहीने मात्र, विरोधकांना काही वेळापुरतेही का होईना चांगले बळ मिळाले.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून महाविकास आघाडी सरकारला कोडीच पकडण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे. ओबीसी आरक्षण आणि राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी या दोन मुद्यांवरून गाजण्याची शक्यता आहे.

या दोन्ही मुद्यावरुन भाजप आघाडी सरकार घेरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी काल भाजपच्या सर्व आमदारांसाठी स्नेह भोजन ठेवण्यात आले होते यावेळी आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती ठरली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT