Maharashtra Budget 2023 : Devendra Fadnavis :
Maharashtra Budget 2023 : Devendra Fadnavis :  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget 2023: अर्थसंकल्पात मोठी घोषणा; पुण्यातल्या भिडेवाडा स्मारकासाठी 50 कोटींचा निधी!

सरकारनामा ब्यूरो

Assembly Budget Session: पुण्यातील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रिबाई फुले यांनी ही अनंत कष्ट झेलून ही शाळा सुरू केली होती. मात्र आज या भिडे वाड्याची अवस्था मोडकळीस आल्यासाऱखी आहे. या वाड्याच्या सरंक्षणासाठी अनेक संघटनांनी आवाज उठवला आहे. या वाड्याचं जतन होऊन, याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी अनेकदा आंदोलनं झाली. अखेर आजच्या अर्थसंकल्पातून भिडे वाड्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पादरम्यान,अनेक मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्यातील बुधवार पेठ येथील भिडे वाड्यासाठीही तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस म्हणाले, "भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे शहरातील भिडे वाडा येथे सुरू झाली. ज्ञानज्योती सावित्रिबाई फुले राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी ५० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली," फडणवीस यांनी जाहीर केली.

भिडे वाडा हा अत्यंत मोडकळीस आलेल्या अवस्थेत होता. याकडे शासनाचं नेहमीच दुर्लक्ष होतं आले आहे. आता शिंदे फडणवीस सरकार यांनी भिडे वाड्याचं जतन करून, त्यांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी सरकारने तरतूद केली आहे. यापुढे आता भिडे वाड्याची दुर्दशा थांबून, त्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर किती वेळात होणार, हे पाहणे महत्वपूर्ण आहे.

सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ आणि या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्याच्या दरम्यान दिले होते. विधानसभेत सांगितले. त्या नुसार आता अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT