ajit pawar sarkarnama
मुंबई

Video Maharashtra Budget 2024 : सावित्रींच्या लेकींना शिक्षण होणार मोफत; अजित पवारांनी काय केली घोषणा?

Ajit Pawar News : अजित पवारांनी घोषित केलेल्या योजनेचा तब्बल 2 लाख मुलींना फायदा होणार आहे.

Akshay Sabale

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुती सरकारनं अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि युवतींबाबत महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लाडकी बहिण योजना, विवाहीत मुलींसाठी शुभमंगल योजना, अशा घोषणा अजित पवारांनी केल्या आहेत. त्यासह मुलींच्या शिक्षणाबद्दल अजित पवारांनी मोठी घोषणा केली आहे. 8 लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं आहे.

अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले, "राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींचं प्रमाण वाढविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, वैद्यकीय, कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रूपये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क 100 टक्के माफ करण्यात येत आहे."

"या निर्णयाचा 2 लाख 5 हजार मुलींना लाभ होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024 पासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 2 हजार कोटींचा भार राज्य सरकार उचलणार आहे," अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT