Mangal Prabhat Lodaha  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget 2024 News : विधिमंडळात आदिवासी धर्मांतराचा मुद्दा गाजला; दोन्ही सवलतींचा लाभ घेणारे 257 विद्यार्थी !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी आदिवासी धर्मांतराचा मुद्दा चांगलाच गाजला. त्यामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले होते. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सखोल चौकशी करण्याचे निर्देश नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडला.

महाराष्ट्रातील आयटीआय संस्थांमध्ये अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारी आणि आदिवासी समाजातून धर्मांतर करून अल्पसंख्याक आणि आदिवासी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारे 257 विद्यार्थी असल्याचे निदर्शनास आले. (Maharashtra Budget 2024 News)

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 2023 ला प्रवेश प्रक्रियेमध्ये आदिवासी प्रशिक्षणार्थींनी घेतलेल्या सवलतींच्या लाभामध्ये झालेल्या अनियमिततेचा अभ्यास करण्यासाठी या समितीचे गठन Maharashtra Budget 2024 News करण्यात आले होते. शुक्रवारी या समितीचा अहवाल कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabht Lodha) यांनी विधानसभा (Vidhan Sabha) आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये मांडला.

हा अहवाल बनवताना गठीत केलेल्या समितीने अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या 13 हजार 858 विद्यार्थ्यांची माहिती तपासली आणि या वेळी काही महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या. या 13 हजार 858 विद्यार्थ्यांपैकी 257 विद्यार्थ्यांनी हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्म नोंदवलेले आहेत. ही बाब गंभीर असून, त्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येणार आहेत.

या सर्व 257 विद्यार्थ्यांचा तपशील घेण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी गठीत केलेली समिती संबंधित औद्योगिक प्रशासकीय संस्था, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, ग्रामसभा इत्यादी ठिकाणी भेट देईल आणि अहवाल सादर करणार आहे.

त्यासोबतच या 257 विद्यार्थ्यांनी धर्म बदललेला असेल, तर त्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती ग्राह्य धरल्या जातील का? याबाबत समितीने सर्वंकष अभ्यास करून उपाययोजना सुचवाव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT