Anil Parab vs Pravin Darekar: Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget 2025: संभाजी महाराजांसोबत तुलना करणं अनिल परबांना महागात पडणार; निलंबनासाठी सत्ताधारी आक्रमक

Anil Parab vs Pravin Darekar:राज्यपालांच्या भाषणांचा अपमान अनिल परब यांनी केला आहे, याबाबत त्यांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना सळो की पळू सोडणार, असा इशारा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: "छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला," असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केले आहे. परबांच्या या विधानामुळे सत्ताधारी आक्रमक झाले आहे, अनिल परब यांचे निलंबन करा, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली आहे.

अनिल परब यांच्याविरोधात आज विधिमंडळाच्या पायऱ्यावर महायुतीच्या आमदारांनी आंदोलन केले. छत्रपती संभाजी महाराज आणि राज्यपालांच्या भाषणांचा अपमान अनिल परब यांनी केला आहे, याबाबत त्यांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना सळो की पळू सोडणार, असा इशारा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

अनिल परब यांनी सभागृहात नाक्यावरची भाषा वापरु नये, त्यांनी केलेले विधानं शोभणारं नाही, असे दरेकर म्हणाले.छत्रपती संभाजी महाराजांसोबत अनिल परब यांनी स्वत:ची तुलना केली आहे. त्यांच्या विधानाचे पडसाद विधीमंडळात उमटत आहे. परबांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांच्या निशाण्यावर परब आले आहेत.

(न्यूज अपडेट होत आहे)

काय म्हणाले होते अनिल परब

  • संभाजी महाराजांचा विचार, वारसा कोणी चालवला असेल तर ‘छावा’ बघा आणि मलापण बघा. धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि माझा पक्षा बदलावा म्हणून छळ झाला

  • ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स… चांगलचं आहे ना, मी पण तेवढाच कडक आहे ना..! ते राऊत साहेब गेले, थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो.

  • माझ्यावरती अनन्य अत्याचार झाले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे, पण मी देखील त्यांचा वारसा जपणारा आहे, त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला.

  • मी पक्ष बदलला नाही, याचा मला अभिमान वाटतो. जे पक्ष बदलून गेले, ते आता आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा सांगत आहे,

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT