Maharashtra Budget Session : ravindra dhangekar : Ashwini jagtap
Maharashtra Budget Session : ravindra dhangekar : Ashwini jagtap Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget Session : नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि रवींद्र धंगेकर यांचा शपथविधी!

सरकारनामा ब्यूरो

Ashwini Jagtap : आज महाराष्ट्र विधिमंडळा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरा आठवडा आहे. आज दुपारी दोन वाजता महाराष्ट्राच अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर होणार आहे. दरम्यान या पोटनिवडणुकीच विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप व रवींद्र धंगेकर यांनी आपल्या आमदारकीचं शपथ घेतले आहे. नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी पार पडला.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार यांचा आज विधिमंडळ सभागृहात शपथविधी पार पडला. शपथविधि पार पडल्यानंतर आता या दोन्ही नवनिर्वाचित आमदारांना विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होता येणार आहे.

अश्विनी जगतापांचा चिंचवडमध्ये विजय :

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडची पोटनिवडणूक लागली. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला. त्यांना १ लाख ३५ हजार ४९४ मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांच्या राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना ९९ हजार ४२४ मते मिळाली. यात जगताप यांचा ३६ हजार ७० मतांनी विजय झाला आहे. तिसऱ्या स्थानावरील अपक्ष राहुल कलाटे यांना ४० हजार ७५ मते मिळालेली आहेत.

रवींद्र धंगेकर यांचा कसबा मध्ये विजय :

कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला होता. भाजपला बालेकिल्ल्यातच धंगेकरांनी मोठे खिंडार पडले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची विजय खेचून आणला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात ११ हजार ४० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंचा धक्कादायक पराभव धंगेकरांनी घडवून आणला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT