Maharastra Budget Session : Deepak Kesarkar
Maharastra Budget Session : Deepak Kesarkar Sarkarnama
मुंबई

Maharastra Budget Session : ठाकरे-केसरकर आले समोरासमोर, नमस्कार केला पण... काय घडलं नेमकं?

सरकारनामा ब्यूरो

Deepak Kesarkar News : सद्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलाच अर्थसंकल्प आहे. पक्षाचं चिन्हं आणि नाव शिंदे गटाल बहाल केल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटात वाद टोकाला पोहचला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. आता ठाकरे आणि शिंदे गटातील नेते काही क्षणासाठी समोरासमोर आले होते. यावेळी नाट्यमय घडामोडी घडून आल्या.

मात्र आता अधिवेशन सुरू असताना शिंदे आणि ठाकरे गटाचा आमना-सामना होत आहे. आज देखील असा सामना पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे आज दुपारच्या सुमारास विधिमंडळ परिसरात आले होते. त्यांच्यासोबत माजी मंत्री आदित्य ठाकरे देखील सोबत होते. जेव्हा उद्धव ठाकरे यांची एन्ट्री करणार तेवढ्यात मंत्री दीपक केसरकर आले.

यावेळी केसरकरांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. मात्र, उद्धव ठाकरेंनी केसरकरांकडे साफ दुर्लक्ष केले. यानंतर केसरकरांनी पुन्हा नमस्कार केला, मात्र तरीही ठाकरेंनी त्यांच्याकडे बघितले देखील नाही. तिसऱ्यांदा जेव्हा केसरकरांनी नमस्कार केला, तेव्हा ठाकरेंनी त्यांना प्रतिसाद दिला. यावेळी केसरकरांच्या चेहऱ्यावरचे भाव, सारं काही सांगून जात होतं.

यानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ तिथे आदित्य ठाकरे ही आले. केसरकरांनी आदित्य यांनाही नमस्कार केला. पण, आदित्य ठाकरेंनी केसरकरांकडे न पाहताच, त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांच्याशी न बोलताच ते तिथून निघून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT