maharashtra cabinet expansion news update  sakarnama
मुंबई

भाजप-शिंदे समर्थकांत वादाची ठिणगी ? ; नाराज आमदारांना सांभाळण्यासाठी शिंदेंची कसरत

maharashtra cabinet expansion news update | संजय राठोड व टीईटी घोटाळ्याप्रकरणी वादात सापडलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गेल्या ४० दिवसांपासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर काल (मंगळवारी) मुंबईच्या राजभवनात पार पडला. या वेळी भाजप (bjp) व शिंदेसेनेच्या (shinde camp) प्रत्येकी ९ अशा एकूण १८ आमदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (maharashtra cabinet expansion news update)

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गट व युतीच्या सरकारमधीलच मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली. दरम्यान, पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मविआ सरकारमधून मंत्रिपद गमावलेले दिग्रसचे आमदार संजय राठोड व टीईटी घोटाळ्याप्रकरणी वादात सापडलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या.

राठोड यांना पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला असला तरी तो न्यायालयाने अद्याप स्वीकारलेला नसतानाही त्यांना मंत्रिपद देण्यात आले. अब्दुल सत्तार यांचे नाव टीईटी घोटाळ्यात समोर आल्याने त्यांचा पत्ता कापला जाईल, असे अनेकांना वाटत होते. मात्र अशा परिस्थितीतही शिंदे यांनी त्यांना मंत्रिपद दिले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून ज्यांनी शपथ घेतली आहे, ते लक्षात घेता राज्यात भाजपवर अजूनही फडणवीस यांचाच पूर्णपणे वरचष्मा असल्याचे चित्र आहे. फडणवीस यांच्या मर्जीतील लोकांनाच पहिल्या विस्तारात शपथ देण्यात आली.फडणवीस यांची फारशी मर्जी नसलेल्यांचा पत्ता कापण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिंदे, सिरसाट नाराज

शिंदे गटातील संजय शिरसाट, बच्चू कडू यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आपली नाराजी जाहीर केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सत्तासंघर्षात गुवाहाटीत जसे सांभाळले होते, त्याहून अधिक आमदारांची मर्जी सांभाळण्याची कसरत एकनाथ शिंदे यांना करावी लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

भाजप दबाव कायम ठेवणार

संजय राठोडांना मंत्रिपद दिल्याने भाजपच्या चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी राठोड यांच्या विरोधातील लढा सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे भाजपमध्ये पक्षश्रेष्ठींच्या मनात नसताना कुणीही उठून प्रतिक्रिया देणे शक्य नसल्याचे भाजपमधीलच ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत शिंदे यांच्याविरुद्ध भाजप विविध राजकीय कुरघोड्या करत दबाव कायम ठेवणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT