आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी काँग्रेसने कात टाकली आहे, नव्या-जुन्यांचा समन्वय साधत नवी कार्यकारणी जाहीर केली आहे. कार्यकारिणीत अनुभवी आणि नव्या दमाच्या अशा दोन्ही प्रकारच्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे, ज्यामुळे पक्षाला नवा उत्साह मिळेल अशी पक्षश्रेष्ठींना अपेक्षा आहे.
प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होऊन हर्षवर्धन सपकाळ यांना जवळपास सहा महिने झाले असताना काँग्रेसची कार्यकारिणी यादी कधी जाहीर होणार, असा प्रश्न विचारण्यात येत होता. सहा महिन्याच्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने कार्यकारिणी जाहीर केली आहे. नव्या कार्यकारणीत काँग्रेसने भौगोलिक-सामाजिक समतोल साधल्याचे दिसते.
41 टक्के ओबीसी, 19 टक्के एससी एसटी तर 33 महिलांना संधी देण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत 33 टक्के ज्येष्ठ व अनुभवी नेते असून 66 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी रात्री उशिरा ही यादी जाहीर करण्यात आली. यादीत बहुतांश जुनेच नेते आहेत. काही ठिकाणी मात्र नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
यामध्ये राजकीय व्यवहार समितीत 36 वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. 16 वरिष्ठ उपाध्यक्ष, 38 उपाध्यक्ष, 5 वरिष्ठ प्रवक्ते, 108 सरचिटणीस, 95 चिटणीस, 87 नेते कार्यकारी समितीमध्ये आहेत. अनंत गाडगीळ, अतुल लोंढे, धीरज देशमुख, गोपाळ तिवारी, सचिन सावंत यांची वरिष्ठ प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. माध्यम समन्वयक म्हणून पुन्हा एकदा श्रीनिवास बिक्कड यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि राज्यातील इतरही प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.