Ajit Pawar, Chandrakant Patil Latest Marathi News
Ajit Pawar, Chandrakant Patil Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

चंद्रकांतदादांनी शरद पवारांकडे बोट दाखवले अन् अजितदादा म्हणाले, सुचनेला माझं अनुमोदन!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी हा एका व्यक्तीचा पक्ष आहे, एकच व्यक्ती पक्ष चालवतो, अशी टीका केली होती. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना टोला लगावला आहे. नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आला म्हणून ह्यांना संधी मिळाली. त्यांना स्वत:मुळे संधी मिळालेली नाही, असं पवार म्हणाले. (Ajit Pawar Latest Marathi News)

मुंबईत माध्यमांशी बोलताना पवार यांनी ही टीका केली. ते म्हणाले, बहुतेक ठिकाणी तीच परिस्थिती असते. बाळासाहेब ठाकरे हेच फक्त शिवसेना चालवत होते. बाकीचे त्यांना मदत करत होते. आजच्या घडीला जे भाजपचे राज्याचे अध्यक्ष म्हणतात कितीही कुणी सांगितलं तरीदेखील नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आला म्हणून ह्यांना संधी मिळाली. (Chandrakant Patil Latest Marathi News)

स्वत:मुळे संधी मिळालेली नाही, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी. आम्हीही पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. त्यांचा फोटो लावतो तेव्हा मतं मिळतात. ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन तसेच आले. ममता बॅनर्जी एकट्या लढल्या. नवीन पटनायकांनी ओडिशाची सुत्रं हाती घेतल्यानंतर तेथील जनता सातत्याने त्यांच्या पाठिशी उभी आहे, असं पवारांनी सांगितलं.

मागच्या काळात काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधीकडे बघून जनता त्यांच्यामागे उभी राहत होती. आता मोदींचा करिष्मा आला. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेले आम्हाला मान्यच आहे. त्यांच्या सुचनेला माझं अनुमोदन आहे, असं टोला पवारांनी लगावला.

दरम्यान, राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ऊसाचे गाळप होत नसल्याने एका शेतकऱ्याने (Farmer) ऊसाचा फड पेटवून देऊन फडातच असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हिंगणगाव (ता. गेवराई) येथे घडली आहे. याबाबत पवारांनी ऊस गाळपासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावल्याचे सांगत शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असं आवाहनही केलं आहे.

गळीत हंगाम लांबलाय. ऊसाचे क्षेत्र वाढल्याने एप्रिल अखेरपर्यंतही ऊस संपला नाही. त्यामुळे मेमध्ये आम्ही रिकव्हरी लॉस आणि वाहतूक अऩुदान दिले आहे. आम्ही सतत स्थितीचा आढावा घेत आहे. तरीही बीडमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की, घाबरून जाऊ नको.

सगळा ऊस गळिताला नेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. ऊस संपवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सरकार तुमच्या पाठिशी आहे. टोकाची भूमिका घेऊ नका. ऊसाचे काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे. साखर आयुक्त व सहकारमंत्री आढावा घेत आहेत, असं पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT