Ajit Pawar, CM Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Mahayuti Government : मार्गशीर्ष सुरू होताच 'या' तारखेला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ?

Maharashtra Government Formation : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला चांगला कौल दिला आहे. या निवडणकीत महायुतीने तब्बल 236 जागांवर विजय मिळवला आहे. निकालानंतर आता महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच आता महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्याची माहिती समोर आली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 26 Nov : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला चांगला कौल दिला आहे. या निवडणकीत महायुतीने तब्बल 236 जागांवर विजय मिळवला आहे. निकालानंतर आता महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अशातच आता महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्याची माहिती समोर आली आहे. सध्या केंद्रात तसेच राज्यात भाजप (BJP) आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रि‍पदाबाबतच्या चर्चा सुरू आहेत.

शिवाय राज्यातील सरकारचा शपथविधी कधी घ्यायचा याबाबतची चर्चा सुरू असून मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानंतर महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती सुत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. 'साम'च्या वृत्तानुसार 2 डिसेंबरला महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता शपथविधीला अवघे 4 ते 5 दिवस उरले असून या शपथविधीच्या सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे राजीनामा देण्याची शक्यता आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू असल्याचं दिसत आहे.

राजीनामा देण्याआधी CM शिंदेंचं शिवसैनिकांना आवाहन

एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याआधी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये लिहिलं, "महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे.

तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT