Mumbai : छत्तीसगड विधानसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्यासाठी भाजपने मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप जाहीर केलेला नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) हे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल छत्तीसगडचे मुख्यमंत्री होणार का ? हे लवकरच समजेल.
राज्यपाल रमेश बैस यांची छत्तीसगड मध्ये मोठी लोकप्रियता आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत रमेश बैस यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा, अशी मागणी पुढे येत आहे.
मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून भाजप पक्षश्रेष्ठी देखील रमेश बैस यांच्या नावावर विचार करत असल्याची सुत्रांची माहिती आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.
रमेश बैस हे झारखंडचे राज्यपाल होते. रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1928 रोजी अविभाजित मध्य प्रदेशातील रायपूर येथे झाला. त्यांनी भोपाळ येथून बीएससीचे शिक्षण घेतले होते आणि बराच काळ शेती केली होती. रमेश बैस जुलै 2021 मध्ये झारखंडचे राज्यपाल होते. जुलै 2019 ते जुलै 2021 पर्यंत त्रिपुराचे 18 वे राज्यपाल होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.