Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Thackeray vs Shinde : महाराष्ट्र सत्‍तासंघर्ष ; आज सुनावणीची शक्यता, काय होणार ?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील राजकीय संकटात शिवसेना (shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि शिवसेनेतील बंडखोर शिंदे गट (Shinde Group) यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज (बुधवारी) सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. (Thackeray vs Shinde latest news)

सर्वोच्च न्यायालयाचे पाचसदस्यीय खंडपीठ खटल्याची सुनावणी करेल. आज सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेनेतील दोन गटांचा वाद शिगेला पोहोचला आहे. एकीकडे आमदारांच्या अपात्रतेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे, खरी शिवसेना कोणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर शेवटची सुनावणी २३ ऑगस्ट रोजी झाली होती. पुढील सुनावणी घटनापीठासमोर होईल, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणाच्या सुनावणीला तारीख मिळाली नाही.

शिंदे गटाचे यांचे वकील नीरज किशन कौल यांच्या तत्काळ सुनावणी अर्जावर सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्या. रवींद्र भट्ट यांच्या पीठाने सांगितले की, बुधवारी प्रकरणाची सुनावणी होऊ शकते. कौल म्हणाले, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पाहता त्यावर त्वरित उपाय आवश्यक आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन केले आहे. घटनापीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा समावेश आहे.

उदय लळीत यांनी या घटनापीठात स्वतःचा समावेश करून घेतला नाही. ते ८ नोव्हेंबरनंतर कार्यमुक्त होणार आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःचा समावेश घटनापीठात केला नसेल, अशी शक्यता व्यक्त केली जाते.

राज्यातील सत्तासंघर्षात निवडणूक आयोगापुढे सुरू असलेल्या कार्यवाहीला तातडीने ग्रीन सिग्नल द्यावा, अशी मागणी शिंदे गटाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिकेद्वारे केली आहे. निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT