India Sarkarnama
मुंबई

India Alliance Meeting : राहुल गांधी, खर्गे, पवार, ठाकरे, ममतादीदी अन् नितीशबाबू ठरविणार पुढची रणनीती

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : 'इंडिया' आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह पाच राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने मुंबईत देशातील अनेक ज्येष्ठ नेते येणार आहेत.

पाटणा, बंगळुरूनंतर आता मुंबईत इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला ग्रँड हयात येथे होणार आहे. बैठकीला दिल्ली, बिहार, तामिळनाडू, बिहार, झारखंडचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर ता. १ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद होणार आहे,

यानिमित्ताने आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सुभाष देसाई आदी नेते उपस्थित होते.

INDIA अर्थात इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स ही तब्बल २६ राजकीय पक्षांनी मिळून बनवलेली विरोधकांची महाआघाडी आहे. सत्ताधारी भाजपप्रणित एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांची एकवटलेली वज्रमूठ आहे.

या बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी महाविकास आघाडीवर असणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससोबतच शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्रितपणे या तिस-या बैठकीचं आयोजन करणार आहेत.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT