Vijay Wadettiwar Sarkarnama
मुंबई

Congress Politics : जनसुरक्षा विधेयक पास झाल्याने काँग्रेस हायकमांड नाराज, विजय वडेट्टीवारांविरोधात थेट नोटीसच धाडली

Jan Suraksha Bill 2025 : यंदाच्या पावसाळी अधिवेशनात 'जनसुरक्षा विधेयक 2025' मोठ्या बहुमताने मंजूर करण्यात आलं. मात्र, या विधेयकावरून आता काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यानंतर आता काँग्रेसने या विधेयकावर आक्षेप घेत विरोध करायला सुरूवात केली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 17 Jul : यंदाच्या पावसाळी अधिवेशनात 'जनसुरक्षा विधेयक 2025' मोठ्या बहुमताने मंजूर करण्यात आलं. मात्र, या विधेयकावरून आता काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यानंतर आता काँग्रेसने या विधेयकावर आक्षेप घेत विरोध करायला सुरूवात केली आहे.

मात्र, ज्यावेळी जनसुरक्षा विधेयक विधिमंडळात पास केलं जात होतं, त्यावेळी काँग्रेसकडून हवा तसा विरोध करण्यात आला नाही. त्यामुळे काँग्रेसवर डाव्या संघटनांनी नाराजी दर्शवली होती. अशातच आता या घटनेची गंभीर दखल घेत काँग्रेस हायकमांडकडने काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांना थेट कारणे दाखवा नोटीस धाडली आहे.

हे विधेयक पास केलं जात असताना विजय वडेट्टीवार सभागृहात गैरहजर होते. त्यामुळे एवढं महत्त्वाचं विधेयक पास करत असताना ते गैरहजर का राहिले आणि त्यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध का केला नाही? असा जाब या नोटीसमध्ये विचारण्यात आला आहे.

दरम्यान, जनसुरक्षा विधेयक राज्य सरकार पास करत असताना केवळ कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी तीव्र विरोध केला. तर दुसकीकडे काँग्रेसने मात्र तटस्थ आणि मवाळ भूमिका घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या दिवशी हे विधेयक सभागृहात मांडण्यात येत होते त्या दिवशी काँग्रेस गटनेतेच गैरहजर असल्याने विधेयकाला पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा याबाबत काँग्रेस आमदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

त्यानंतर विधेयक पास झाल्यावर विधेयकाबाबतची भूमिका आमदारांना कळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याच सर्व घटनांची दखल काँग्रेसच्या वरिष्ठांनी घेतली असून त्यांनी आता महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांना जाब विचारला आहे. त्यामुळे या नोटीसला विजय वडेट्टीवार नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे संरक्षण, समाजविघातक प्रवृत्तींचा बंदोबस्त आणि सार्वजनिक ठिकाणी हिंसक किंवा भडकावू कृत्यांना आळा घालण्यासाठी जनसुरक्षा विधेयक आणल्याचा दावा केला आहे. या विधेयकानुसार, कोणताही व्यक्ती जर समाजात भीती निर्माण करणाऱ्या वर्तनात सहभागी आढळला, तर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT