Maharashtra Assembly
Maharashtra Assembly 
मुंबई

Maharashtra Assembly : युवराजांची दिशा चुकली ; "आदित्य ठाकरे गाढवावर.." शिंदे गटाची बॅनरबाजी

सरकारनामा ब्युरो

शिंदे गटाने थेट ठाकरे कुटुंबियांना टार्गेट केले आहे. आज सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांनी ,प. पू. युवराज म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवरून शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत निशाणा साधला आहे. आंदोलकांनी हातात एक मोठं बॅनर पाहायला मिळत आहे. यावर आदित्य ठाकरेंचा व्यंगचित्र पाहायला मिळत आहे. ज्यावर आदित्य ठाकरे गाढवावर उलट्या दिशेने बसलेले दिसले. ज्यावरून आदित्य ठाकरेंची दिशा चुकली, पर्यावरण खातं त्यांनी घरातं राहून सांभाळलं, अशा देण्यात आला आहे.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट व भाजप आमदारांची आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरेंच्या पोस्टर्ससह '50 खोके, मातोश्री ओके', 'युवराज दिशा भरकटले', अशी घोषणाबाजी सत्ताधारी करत आहेत.

Maharashtra Assembly

मुंबई : गेले पाच दिवस विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरल्यानंतर आज अधिवेशनात शेवटचा दिवस आहे. अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर आज चर्चा होणार आहे. तब्बल 23 लक्षवेधी सूचना विरोधकांकडून मांडण्यात आले आहेत. म्हणजेच आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रोजगार भरती, आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण, रस्त्यांची दुर्दशा आदी मुद्द्यांवर मंत्र्यांना स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. त्यामुळे आजचा शेवटचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. काल सत्ताधार पक्षांच्या आदोलनानंतर मात्र बराच राडा पाहायला मिळाला. यावेळी आमदारांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची पर्यंत गोष्टीं घडल्याने कालचा दिवस अतिशय वादळी ठरला.

आज सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे आज सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे आहेत का, हे लवकरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT