Mumbai North-East Lok Sabha Election 2024 Voting LIVE Sarkarnama
मुंबई

Thackeray group News: राऊत अन् पोलिसांमध्ये बाचाबाची; भांडुप येथील मतदान केंद्राजवळ ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात

Mumbai North-East Lok Sabha Election 2024 Voting LIVE : ठाकरे कार्यकर्त्यांना सुमारे तासभर मतदान केंद्रात बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना घेऊन पोलिस कांजूरमार्ग पोलिस ठाण्याकडे रवाना झाले आहेत.

Mangesh Mahale

मतदारांना डमी मशिनचे प्रात्यक्षिक दाखवत असणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भांडुप मतदान केंद्राबाहेर हा प्रकार घडला. ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत पोलिसांनी जाब विचारला असून राऊत आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

भाजपला (BJP) आपला पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी ही कारवाई केली आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. पोलिसांवर दबाब असल्याने त्यांनी ही कारवाई केल्याचे राऊत म्हणाले. ठाकरे कार्यकर्त्यांना सुमारे तासभर मतदान केंद्रात बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना घेऊन पोलिस कांजूरमार्ग पोलिस ठाण्याकडे रवाना झाले आहेत.

हे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत प्रचारात करीत होते, असे पोलिसांनी सुनील राऊतांना सांगितले, पण दावा राऊतांनी खोडून काढला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले नाही तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा राऊतांनी दिला आहे.

मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी समांतर मतापत्रिका ठेवल्या होत्या. आमच्या शिवसैनिकांना त्यांनी दादागिरी करुन अटक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दबाव टाकून शिवसैनिकांना अटक करायला लावली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "पराभव समोर दिसत असल्याने विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. आम्ही केलेल्या विकासकामे जनतेच्या समोर आहेत, त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजय नक्की होईल,"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT