Basaveraj bomai
Basaveraj bomai Sarkarnama
मुंबई

Karnataka Border Dispute : सीमावाद पुन्हा चिघळला ; अथणी-पुणे बसवर दगडफेक

सरकारनामा ब्युरो

Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे जुन्या वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्र (maharashtra) आणि कर्नाटक (karnataka)सीमाप्रश्न सुटलेलं नसताना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर सहा गावे कर्नाटकात जोडण्यावर गांभीर्य़ाने विचार सुरु आहे, असं वादग्रस्त विधान बसवराज बोम्मई यांनी केले आहे. यामुळे राजकीय वातावरण पेटलं आहे.

या वादातच सांगली जिल्ह्यातील तिकोंडी गावच्या गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये विलीन होण्याची इच्छा रविवारी जाहीर केली आहे. गावात कर्नाटकचा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात आली तसेच गावच्या वेशीवरच्या कमानीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यात आला आहे.

जत तालुक्यातील पूर्व भागातील गावांवरून महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद चिघळला आहे. या वादाचे तीव्र पडसाद रविवारी रात्री उमटले. मिरज तालुक्यात कर्नाटकच्या अथणी-पुणे बसवर दगडफेक झाली. म्हैसाळ (ता. मिरज) गावाजवळ रात्री साडेदहा वाजता कर्नाटकची अथणी ते पुणे बस म्हैसाळपासून थोड्या अंतरावर आल्यानंतर अज्ञाताने पुढील काचेवर दगड मारला. यामध्ये काच फुटली.

त्यानंतर कर्नाटक परिवहन मंडळाने महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत. शिवाय सांगली, मिरज आगारातून अथणी, कागवाडला जाणाऱ्या बसेस कर्नाटक पोलिसांनी कागवाडजवळ रोखल्या आहेत.त्यानंतर दोन्ही राज्यांतील शासकीय बसेसची ये-जा बंद झाली आहे.

तिकोंडी गावापासून तीन किलोमीटरवर कर्नाटकातील विजयपूर जिल्हा आहे. तिकोंडी ग्रामस्थांनी शनिवारी तुबची-बबलेश्वर पाणी समितीच्या नेतृत्वा खाली कर्नाटकचा ध्वज घेऊन ग्रामपंचायतीसमोर बसस्थानकापर्यंत घोषणा देत पदयात्रा काढली. यामध्ये महातेश अमृतट्टी, वसीम मुजावर, महातेश रायचौड़ा, सोमनिंग चौधरी, अनिल हट्टी, रायगौंडा माडोळी यांचा समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT