Vidhan Parishad Election 2022 Live : उमा खापरे यांना पडलेल्या एका मतावर आक्षेप...
भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
सरकारनामा ब्युरो
भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांना पडलेल्या पहिल्या पसंतीच्या मतावर महाविकास आघाडीने आक्षेप घेण्यात आला आहे. हे मत वैध की अवैध याचा निर्णय झाल्याशिवाय विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार नाही. या बाबतचा निर्णय थेट निवडणूक आयोग घेणार आहे. दिल्लीपर्यंत साऱ्या घडामोडी पोहोचणार असल्याचे दिसून येत आहे. या आधी राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांना पहिल्या पसंतीच्या मतावरील तिसऱ्या पसंतीच्या क्रमांकावरील मताला आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अद्याप जाहीर केलेला नाही. हा वादही निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद झाले आहे. राष्ट्रवादीच्या एका मतावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सध्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. एक मत बाद झाल्यामुळे मतांचा कोटाही कमी झाला आहे. २५. ८१ इतका मतांचा कोटा झाला आहे. त्यामुळे आता रामराजे नाईक निंबाळकर डेंजर झोनमध्ये आहेत. हे मत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बाजूला काढून ठेवलं आहे.
Ramraje Naik Nimbalakar
शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी (Amsha Padvi) यांच्या समर्थकांनी विधानभवनाबाहेर विजयाचा जल्लोष सुरू केला आहे. विजयाची खात्री असल्याने त्यांचे समर्थक विजयाचा गुलाल घेऊन आले आहेत. परंपरागत ढोल पथकांसह विजयाचा जल्लोष सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे एकनाथ खडसे यांचेही कार्यकर्ते विजयाच्या तयारीने आले आहेत. त्यांनीही नाथाभाऊ हे विधान परिषदेत जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. नाथा भाऊ खडसे, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा हे कार्यकर्ते देत होते. काही खोडकर समर्थक हे टरबूज घेऊन आले आहेत. सचिन अहिर यांच्याही कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. या निवडणुकीत 11 उमेदवारांपैकी 10 जणांचा विजय निश्चित असल्याने संबंधित उमेदवारांचे समर्थक विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. काॅंग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांच्या घोषणा देण्यात येत आहेत. फक्त प्रसाद लाड आणि भाई जगताप या दोघांनाच सध्या टेन्शन आहे. सचिन अहिर यांच्याही विजयासाठी गुलालाची तयारी झाली आहे.
Amasha Padvi
केंद्रीय निवडणूक आयोगाने काॅंग्रेसचा आक्षेप फेटाळला. मतमोजणीला सुरवात. मतांची वैधता आधी तपासली जाणार. काऊंटिंग एजंट म्हणून भाजपकडून गिरीश महाजन, संजय कुटे आणि नितेश राणे यांची नियुक्ती. कॉग्रेसचे पोलिंग एजंट सतेज पाटील, संजय जगताप, सुनील केदार उपस्थित होते. अभिजीत वंजारी, सतेज पाटील , अमर राजुरकर हे काँग्रेसकडून मतमोजणी करता (Counting agent) प्रतिनीधी म्हणून उपस्थित. राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, अनिल पाटील,संजय बनसोडे, दीपक चव्हाण, प्राजक्त तनपुरे हे मतमोजणी प्रतिनिधि आहेत
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावरील आक्षेपांचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याआधीच मतमोजणीला सुरवात. दोन तासांच्या विलंबानंतर मतमोजणीला प्रारंभ. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 26 मतांची आवश्यकता.
बहुजन विकास आघाडीने या निवडणुकीत काॅंग्रेसला साथ दिल्याचे बोलले जात आहे. आमदार हितेंद्र ठाकूर, त्यांचे चिरंजीव क्षितीज आणि तिसरे आमदार राजेश पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीत भाजपला मतदान केल्याची चर्चा होती. या वेळी मात्र त्यांनी काॅंग्रेसला सहकार्य केल्याचे बोलले जात आहे. मतदान झाल्यानंतर ठाकूर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या केबिनमध्ये चहापानासाठी गेले. ठाकूर यांच्या स्वागतासाठी काॅंग्रेसचे अर्धा डझन नेते उपस्थित होते. त्यामुळे ठाकूर यांनी काॅंग्रेसला शब्द दिल्याचे बोलले जात आहे. ठाकूर यांनी असे केले असेल तर काॅंग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप हे निवडून येण्याची शक्यता वाढली आहे.
काँग्रेसची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार.
काँग्रेसचे आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळले. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात काॅंग्रेसने भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर आक्षेप घेतला. या दोघांनी टाकलेले मत हे मत त्याचे नव्हतेच, असा आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात काॅंग्रेसने भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर आक्षेप घेतला. या दोघांनी टाकलेले मत हे मत त्याचे नव्हतेच, असा आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत `सरकारनामा`ने मुक्ता टिळक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की राज्यसभेच्या मतदानाच्या वेळी जी प्रक्रिया राबवली होती त्यानुसारच या वेळीही मतदान केले आहे. या मतदानासाठी 16 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र द्यायचे होते. ते मी दिले होते. निवडणूक आयोगाने माझे पती शैलेश यांना मदतनीस म्हणून नियुक्तीचे पत्र कालच दिले होते. त्यामुळे नियमानुसारच माझे मतदान झाले आहे.
काॅंग्रेसने भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता. काॅंग्रेसने घेतलेला आक्षेप भाजपचे नेते सुधीर मुनगंटिवार यांनी नाकारला. आजारी मतदारांना दुसऱ्यांचे सहकार्य घेऊन मतदान करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काॅंग्रेस या तक्रारीवर तोंडावर आपटले, अशी टीका त्यांनी केली. दुसरीकडे विधीमंडळाचे निवृत्त सचिव अनंत कळसे यांनीही आजारी मतदारांना 18 वर्षावरील सज्ञान व्यक्तीच्या मदतीने मतदान करता येत असल्याचा नियम सांगितला. मात्र उमेदवाराने आपले मत कोणालाही दाखवता कामा नये, अशी अट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाना पटोले- हे गुप्त मतदान आहे. पण त्यांनी गुप्तता पाळली नाही. त्यांनी ओपन मतदान केलं. जगताप यांची मतपत्रिका दुसऱ्याने मतपेटीत टाकली.
कॉंग्रेसचा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतावर आक्षेप. मतदान करताना दुसऱ्याची मदत घेतल्याचा आरोप. कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रारीचा मेल
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दोन नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळू शकला नाही. त्यांना विधान परिषदेसाठी मतदानास परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ही परवानगी आम्ही समजा दिला तरी मतदानासाठी आता कमी वेळ शिल्लक असल्याने त्याची अंमलबजावणी होणार नाही, असे मत व्यक्त केले. याबाबत आम्ही कोणताही आदेश देऊ इच्छित नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. या निकालाबाबत बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी कैद्यांना घटनात्मक अधिकार आहेत की नाही, याबाबत विविध मते आहेत. त्यामुळे या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय पूर्ण विचार करून निकाल देईल असे वाटते. पुढील निवडणुकांबाबत या याचिकेच्या निकालाचा परिमाण होईल, असेही निकम यांनी सांगितले. यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दोन आमदारांना मतदानाची संधी मिळणार नाही. राष्ट्रवादीला त्यामुळे आपल्या 51 आमदारांच्या मतांवर आधारीत रणनीती करावी लागली.
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांना स्लीप डिस्कची समस्या निर्माण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात चार दिवसांपासून उपचार सुरू होते. आज सकाळी ते विधानभवनात मतदानासाठी हजर झाले. त्यासाठी ते व्हील चेअरवर गेले. तेथे सेनेचे आमदार तसेच विधानपरिषदेचे उपसभापती नरहरी झिरवळ, शिरुरचे आमदार अशोक पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी गेटवर जात गडाख यांची विचारपूस केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांची विचारपूस करून काळजी घ्या असे सांगितले. स्वतः अशोक पवार यांनी गडाखांना खांदा देत त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवले. विधान भवनाच्या पायऱ्या आधार घेऊनच गडाख यांना चढाव्या लागल्या. मतदानानंतर ते पुन्हा रुग्णालयात दाखल झाले.
मनसेचे आमदार राजू पाटील हे मतदान करून बाहेर पडले आहेत. पक्षप्रमुख राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली असुन त्यांना भेटायला निघालो आहे, असे पाटील यांनी मतदानानंतर बोलताना सांगितले.
तुम्ही इतक्या उशिरा न्यायालयात का आला? तुम्हाला समजा परवानगी दिली तर तुम्ही मतदान करू शकाल का, असे सवाल सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांना विचारले. त्यावर तुम्ही आदेश दिला तर आम्ही मतदानाची व्यवस्था करू, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले... त्यावर न्यायमूर्तींनी लवकरच निकाल देणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू. दोघांना मतदान करण्यासाठी न्यायालय परवानगी देणार का, याकडे महाविकास आघाडीचे लक्ष लागलं आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अद्यापही मतदान केलेले नाही. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कुणाला मत द्यायचं हे सांगितले असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप विधानभवनात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते मतदान करतील.
आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे शेवटी मतदान करणार
कॉंग्रेसचे मतदान पूर्ण, आघाडीचे सर्व उमेदवार निवडूण येतील असा नाना पटोलेंना विश्वास
मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी नवाब मलिक, अनिल देशमुख यांची सुप्रीम कोर्टात धाव
मतदानासाठी भाजप आमदार लक्ष्मण जगताप एका खासगी कार्डियाक ॲम्बुलन्सने मुंबईकडे रवाना
राष्ट्रवादी ४५ आमदारांनी मतदान केले, शिवसेना आमदारांची दुसरी बसही विधान भवनात पोहचली
वाहतुक कोंडीत अडकलेल्या शिवसेना आमदारांची बस विधान भवनात दाखल, आदित्य ठाकरेंही त्यांच्यासोबत विधान भवनात दाखल
तासाभरात 68 आमदारांचं मतदान झालं आहे. सर्वच पक्षांचे आमदार विधान भवनात दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी मतदान केलं. ते नाराज असल्याची चर्चा होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या आमदार अद्याप पोहचले नाहीत. आमदारांना घेऊन येणारी बस वाहतूक कोंडीत अडकल्याचे समजते.
काँग्रेसचे आमदार विधानभवनात दाखल. आतापर्यंत एकूण 20 आमदारांनी मतदान केले.
आतापर्यंत 15 आमदारांनी मतदान केले असून हे सर्व आमदार भाजपचे असल्याचे समजते.
शिवसेनेचे आमदार विधानभवनाकडे रवाना. शिवसेनेचे सचिन अहिर व आमश्या पाडवी रिंगणात.
महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ही लढत प्रसाद लाड विरूध्द भाई जगताप अशी होणार नाही, असंही ते म्हणाले.
महाविकास आघाडीचं मतांचं गणित जुळल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत तीनही पक्षांची खलबतं सुरू होती.
विधान भवनात काँग्रेस आमदारांची महत्वपूर्ण बैठक सुरू. भाई जगताप यांना आठ मतांची गरज
मतदानाला सुरूवात झाल्यानंतर भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांचं पहिलं मतदान.
विधान परिषदेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील, अण्णा बनसोडे आणि आशुतोष काळे अद्याप मुंबईत पोहचले नाहीत. राज्यसभा निवडणुकीवेळी मोहिते यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक मुंबईकडे रवाना. राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांचं मत महत्वाचं ठरलं होतं.
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे आमदार विधान भवनात दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसला समाजवादी पक्षाचे एक मत मिळणार
बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर परदेशातून मुंबईत पर