मुंबई : महारष्ट्र पोलिस दलात (maharashtra police) काल (बुधवारी) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते. त्याला १२ तास उलटत नाही तोच ५ अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. गृहखात्याच्या या अजब कारभारामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या बदल्यांमधील गृहविभागाचा अजब कारभार समोर आला आहे. गृहविभागाच्या या कारभाराची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे.
बुधवारी गृहविभागाकडून परिपत्रक काढून राज्यातील वादग्रस्त आयपीएस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली होती.काल रात्री गृह खात्याने पदोन्नतीच्या आदेश काढले होते.आज सकाळी मुंबई आणि ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त अशा पाच जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती. बुधवारी हे परिपत्रक जारी करण्यात आलं होतं.
पंजाबराव उगले, राजेंद्र माने, संजय जाधव, दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. या आदेशाला गृहविभागाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
वादग्रस्त आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली होती. यात नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचाही समावेश होता. त्यांच्या जागी नाशिमध्ये जयंत नाईकनवरे कारभार सांभाळणार होते. तर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचीही बदली झाली होती. त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती झाली होती. बीडचे पोलीस अधिक्षक आर. राजा यांची पुण्यात बदली करण्यात आली होती. पुण्यातील मावळ गोळीबार प्रकरणामुळे वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या संदीप कर्णिक यांचं पुण्यात पुनरागमन झालं होतं.
पुण्याचे सहपोलीस आयुक्त म्हणून त्यांच्याकडे कारभार सोपवण्यात आला होता. मिलींद भारंबे यांना पदोन्नती देण्यात आली होती. भारंबे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहणार होते. मात्र, कालच्या या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. कुणाच्या सांगण्यावरुन या बदल्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली, याची चर्चा सध्या सुरु आहे. बदल्या करताना गृहविभागाने अन्य मंत्र्यांना विचारात घेतले नाही, त्यामुळे या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याची चर्चा पोलीस दलात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.