arjun khotkar, sanjay raut sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंची भेट घेणाऱ्या खोतकरांचे राऊतांनी केलं अभिनंदन

खोतकर हे शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच संजय राऊतांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (arjun khotkar) यांनी दिल्लीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यांनतर केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली होती. (sanjay raut latest news)

शिंदे यांची भेट घेतल्यानंतर खोतकर हे शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी भाष्य केलं आहे. खोतकर हे शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच संजय राऊतांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

राऊत म्हणाले, "सोनिया गांधी, राहूल गांधी, संजय राऊतांवर कारवाई ईडी करीत आहे हे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर टाच आणण्याचा प्रयत्न आहे. अर्जुन खोतकर यांचे अभिनंदन करतो की, त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले की, त्यांच्यावर आणि कुटुंबावर ईडीचा तणाव आहे, हे ठोस कारण त्यांनी सांगितले. त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली नाही. त्यांना बदनाम केले नाही आणि फुटीरांसारखे आरोप केले नाही ते खरे बोलले त्यांच्या प्रामाणिकपणाला दाद देतो,"

"अर्जुन खोतकर यांनी प्रामाणिकपणे खरं कारण देत आपल्या निर्णयावर भाष्य केले असल्याचे राऊत यांनी सांगितले. आपल्या भूमिकेसाठी त्यांनी हिंदुत्वाला बदनाम केले नाही," असेही राऊत यांनी म्हटले.

"शिंदे गटातील काही आमदार अस्वस्थ आहेत, त्यांना फसवले गेले. तेच आमदार आता आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे सत्तापरिवर्तन अटळ असेल. महाराष्ट्रात उद्या पुन्हा सत्ता परिवर्तन झाले तर यात आश्चर्य वाटून घेऊ नका," असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. राऊत माध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, " महिना झाला तरी दोघांचेच कॅबीनेट असून ते बेकायदेशिर निर्णय घेत आहेत. त्यात महाराष्ट्र आणि शिंदे यांच्या गटाला (eknath shinde) काय मिळत आहे. शिवसेनेतून बाहेर पडून काय मिळवले याचे आत्मचिंतन करावे लागेल,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT